Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ₹३००० एकत्र जमा होण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana March-April Installment Come Together: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता कधी येणार?

मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

लाडक्या बहिणींना ३००० रुपये एकत्र येणार

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर आता मार्चचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. मार्च महिना संपून गेला तरीही पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मार्च-एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana March-April Installment Come Together)

गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला होता. फेब्रुवारीचा हप्तादेखील मार्च महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर आता मार्चचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर परत एप्रिलच्या हप्त्याबाबतही चर्चा होत आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात या महिन्यात ३००० रुपये एकत्र येऊ शकतात.

मागच्या महिन्यात फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येईल, अशी शक्यता होती. मात्र, महिलांच्या खात्यात फक्त १५०० रुपये जमा झाले. त्यामुळे महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली होती. येत्या काही दिवसात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

ईकेवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय (Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended)

लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ईकेवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे. ईकेवायसीची मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. ३० एप्रिलपर्यंत महिला केवायसीमध्ये दुरुस्ती करु शकतात. ज्या महिलांनी ईकेवायसीमध्ये चूक केली आहे त्या दुरुस्ती करु शकतात.

फक्त याच महिलांना मिळणार पैसे (Only These Women Will Get Benefit of Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांचे अर्ज बाद केले आहेत. जवळपास ७१ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. यामध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत तर काहींनी केवायसी केलेली नाही. या महिलांना योजनेतून बाद केले आहे. त्यामुळे त्यांना १५०० रुपये मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, केमिकल कंपनीतील गॅस लिकेज, १७ जणांना त्रास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Mumbai Crime : कुर्ल्यात गोळीबाराचा थरार, गुंड बाबा याच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या

Vidhan Parishd Election : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पाऊण तास खलबतं; राष्ट्रवादीच्या उमेदवारावर अखेर शिक्कामोर्तब?

Maharashtra News Live Update : मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

SCROLL FOR NEXT