Ladki Bahin Yojana SAAM TV
बिझनेस

ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर; संक्रांतीत ३००० रुपये मिळार? वाचा सविस्तर,VIDEO

ladki bahin yojana update: लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी.. फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अॅडव्हान्स दिला होता. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे.पाहूया...

Tanmay Tillu

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील 1500 रुपये कधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. मात्र लाडकीची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हफ्ते सक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी 3000 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.

लाडकीला 3000 रू. मिळणार?

संक्रांतीआधी मिळणार 3000 रुपये

डिसेंबर-जानेवारीचे दोन्ही हप्ते मिळणार

पावणेतीन कोटी अर्जांच्या फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर

सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना मिळणार लाभ

अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेही आदेश नाहीत

नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्यात

लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहतायत.

लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हफ्ता एकत्र मिळणार आहेत. त्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केलीये.. तर दुसरीकडे मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढीव हफ्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे लाडकीची संक्रांत यंदा गोड होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

SCROLL FOR NEXT