
नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुतीला त्सुनामीसारखं यश मिळालं. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरस ठरली होती. तर विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेलं यश लाडकी बहीण योजनेमुळे मिळालं असल्याचं बोललं जात आहे. महायुतीमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनीही या विधानाला दुजोरा दिला आहे. परंतु महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिपद न मिळालेल्या छगन भुजबळ यांनी निवडणुकीवर मोठं भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेमुळे आमदार निवडून आले नाहीत. त्याला इतर गोष्टी देखील आहेत, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी महायुतीतील वरिष्ठांना सूचीत केले.
नाशिकमधील समता परिषदेच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी यावेळी फक्त योजनेमुळे नाही तर इतर गोष्टीमुळे निवडणुकीत आमदार जिंकल्याचे सांगितले.'
छगन भुजबळ म्हणाले, मला मंत्रिपदाची आस नाही. मी जालन्यातील अंबडच्या सभेला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आलो नसतो. विधानसभेनंतर महापालिका, जिल्हापरिषदेच्या निवडणुका आहेत. फक्त लाडकी बहीण योजनेमुळे आमदार निवडून आले नाही. तर त्यास इतर गोष्टी देखील आहेत. आम्ही रस्त्यावर लढाई घेऊन जाऊ. मी आता संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी आता पुन्हा ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. ओबीसींसाठी दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेलं पाहिलं आहे
मला मंत्रिपद न मिळाल्याने सगळ्यांना शॉक बसलाय. नाशिक आणि येवलासहित सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे. मला फोन आणि मेसेज सुरु झाले आहेत. आमच्याकडे या, अशी मागणी सगळीकडून सुरु आहे. यामुळे सर्व पेटून उठले आहेत. आता पेटून उठला आहात, तरी पेटवापेटवी करू नका. आता पुन्हा हिंसक आंदोलन नको. माझ्यासोबत दलित, मागासर्वगीय, ओबीसी सोबत आहेत. तसे मराठा समाजातील लोकही सोबत आहेत. त्यांनी निवडणुकीत माझं काम केलं. आपले सगळेच दुश्मन नाहीत. आम्हाला संपवण्यासाठी निघालेल्यांना विरोध आहे. मागासवर्गीय हळूहळू वर येतील,अशी भावना त्यावेळी होती. मी मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही.
मागील विधानसभेत पुन्हा मुद्दा आला, त्यावेळी मी पहिला हात वर केला होता. पण त्यांना वेगळं आरक्षण द्या, असं म्हटलं. मराठा समाजाला ईडब्लूएसच्या १० टक्क्यापैकी साडे आठ टक्के आरक्षण मिळत होते. आमच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. तेव्हा कोणाच्या विरोधात बोललो? त्यावेळी काही मेळावे झाले, त्यामुळे सगळ्यांना धीर मिळाला. ते महाशय माझ्या मतदारसंघात आले. त्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला. त्याचा परिणाम झाला. त्यांच्यामुळे माझं लीड कमी झालं. पण माझ्या मतदारसंघातील मतदार पाठिशी ठामपणे उभे राहिले.
मला मंत्रिपदाची आस नाही, जर असता तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अंबडच्या सभेला आलो नसतो. आता महापालिका,जिल्हापरिषदेच्या निवडणुका आहेत. फक्त लाडकी बहीण योजनेमुळे आमदार म्हणून निवडून आलो नाही. लाकडी बहीणमुळे आमदार निवडून आले, असं अनेकांना भ्रम झाला आहे. मात्र इतर गोष्टी देखील आहेत. आता आम्ही रस्त्यावर लढाई घेऊन जाऊ. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी आता पुन्हा एकदा ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. दिल्लीमध्ये रामलीला मैदान भरवलेले मैदान पाहिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.