Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लातूरच्या लाडक्या बहिणींना धक्का, ६६ हजार महिलांचे ₹१५०० स्थगित, नेमकं कारण काय?

Majhi Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेतून आता हजारो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. लातूरमधील तब्बल ६६ हजार ३७९ महिलांचा लाभ तूर्तास थांबवला आहे.

Siddhi Hande

  • लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरु

  • लातूरमधील ६६ हजार ३७९ महिलांचा लाभ तूर्तास बंद

  • पडताळणी होईपर्यंत मिळणार नाहीत पैसे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरु झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून अपात्र महिलांची यादी आता समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून विविध जिल्ह्यांमधून हजारो महिला अपात्र ठरल्या आहेत. दरम्यान, आता लातूरमधील तब्बल ६६ हजार ३७९ महिलांचा लाभ थांबवण्यात आला आहे. या महिलांची निकषानुसार पुन्हा पडताळणी होणार आहे.

लातूरमधील २४ हजार ७७० महिला अपात्र

लातूरमधील २४ हजार ७७० महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यानंतर आता ६६,३७९ महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार लातूरमधील महिलांच्या अर्जांची पडताळणी करण्यास सुरुवात झाली आहे.

लातूरमधील ५ लाख ३७ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आता त्यातील ६६३७९ महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे. अनेक कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तर अनेक महिलांनी इतर शासकीय योजनांचा लाभ घेतलेला आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांचीही संख्या जास्त आहे. या महिलांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे.

लातूरमध्ये २४ हजार ७७० लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत. यामध्ये अजून काही महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. लातूरमधील जवळपास ६६ हजार महिलांचा लाभ तुर्तास थांबवला आहे. जोपर्यंत पडताळणी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

रत्नागिरीतील ५० हजार ७९७ महिलांना फटका

रत्नागिरीतीलदेखील हजारो महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तब्बल ५० हजार ७९७ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतल्याने त्यांना फटका बसत आहे. रत्नागिरीमधून एकूण ४,२४,४४० महिलांनी नोंदणी केली होती. त्यातील ५० हजार ७९८ महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

SCROLL FOR NEXT