Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या कामाची बातमी! ₹3000 खात्यात जमा झाले नसतील तर…

Ladki Bahin Yojana ₹3000 installment update : लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये खात्यात जमा झाले नसतील तर घाबरू नका. ई-केवायसी, आधार-बँक लिंकिंग आणि डीबीटीसंबंधित त्रुटींमुळे अनेक महिलांचे हप्ते अडले आहेत.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana Latest installment Update : राज्यातील पात्र लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर एकाचवेळी ३ हजार रूपये झाले. आचारसंहिता आणि ईकेवायसीमुळे २ महिन्यांचे हप्ते जमा झाले नव्हते. पण मे महिन्यात राज्य सरकारकडून मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे ३ हजार रूपये लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा केले. पण काही महिलांच्या खात्यात पैसे (Ladki Bahin Yojana 3000 installment Latest News) जमाच झाले नाहीत. ईकेवायसी केल्यानंतरही आपल्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत? पात्र असतानाही लाभ का मिळाला नाही? असा प्रश्न महिलांना सतावत आहे. त्या सर्व महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

३० एप्रिल २०२६ पर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना ईकेवायसीमध्ये दुरूस्तीची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मे महिन्यात लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर लाभ जमा होण्यास सुरूवात झाली. ईकेवायसीनंतर राज्यातील ७० लाखांच्या आसपास महिलांचा लाभ बंद झाला आहे. तर एक कोटी ७० लाख महिलांना प्रत्येक महिन्यात १५०० रूपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. पण काही महिला पात्र असूनही खात्यात पैसे आले नाहीत, त्याचं एक कारण समोर आले आहे.

खात्यात पैसे आले की नाही?

ज्या महिलांनी ईकेवायसी केली त्या पात्र महिलांच्या खात्यात ३००० हजार जमा झाले आहेत. पण काही महिलांना लाभ मिळाला नाही, पात्र असतानाही खात्यात पैसे का आले नाहीत? त्यामुळे अनेक महिलांनी जिल्ह्यातील महिला बाल विकास विभागाच्या कार्यालयात धडक मारली. पण जिल्हा कार्यालयात न येता थेट आपल्या बँक खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे की नाही, याची खात्री करावी, असे सांगण्यात येत आहे. पण पैसे आले नाहीत, तर काही गोष्टी पडताळणी करण्याची गरज आहे.

..तर खात्यात ३००० रूपये जमा होणार, करा फक्त एकच काम

अनेक महिलांच्या बँक खाते आणि आधार कार्ड सलग्न नसल्याचे समोर आले आहे. बँकेची ईकेवायसी केली नसल्यामुळेही अनेक महिलांच्या खात्यात ३ हजार रूपयांचा लाभ पोहचला नाही. त्यामुळे ज्या महिलांनी ईकेवायसी केलेली नाही, त्या महिलांनी बँकेत जाऊन ईकेवायसी करावी. त्यानंतर डीटीबीद्वारे तुमच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होतील.

खात्यात पैसे आले नाहीत, लाडक्या बहिणींनी काय करावे?

ईकेवायसीनंतर राज्यातील जवळपास एक कोटी ७० लाख महिलांना प्रत्येक महिन्यात १५०० रूपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे. पण काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. राज्य सरकारकडून याबाबतच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. ई-केवायसी संदर्भातील त्रुटी, बँक खात्याशी संबंधित अडचणी, तसेच हप्ता थांबण्याच्या तक्रारी लाडक्या बहिणींकडून समोर आल्यात. त्यामुलेराज्य सरकारने 181 हेल्पलाईन नंबर (Ladki Bahin Yojana helpline number) सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या पात्र महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यांनी १८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकाच वेळी दोन मोठ्या घोषणा; इंग्लंडविरुद्ध वनडेआधीच टीम इंडियात बदल; झिम्बाब्वे दौऱ्यात 'चॅम्पियन'ला डच्चू

पावसाळ्यात वारंवार येणाऱ्या रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्टचा अर्थ काय?

पहिल्याच पावसात गुणवत्ता 'मिसिंग'; मे महिन्यात उद्घाटन, 6 जुलैला कोसळली दरड

Mumbai Rain: मुंबईत 24 तासांत 12 जणांचा मृत्यू , झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच

ठाणे, कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर KDMCचा निर्णय

SCROLL FOR NEXT