Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: महिना संपायला उरले अवघे १० दिवस, जूनचा हप्ता कधी येणार? लाडक्या बहिणींना प्रतीक्षा

Majhi Ladki Bahin Yojana June Month Installment Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लवकरच लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता दिला जाईल.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडला आहे. सर्वजण जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, जून महिना संपायला अवघे १० दिवस उरले आहेत. त्यामुळे अनेकजण जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत. पुढच्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात.

लाडक्या बहि‍णींना जूनचा हप्ता कधी? (When Will Women Get June Month Installment)

लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला दिला होता. त्यानंतर जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहे. महिना अखेरपर्यंत म्हणजे पुढच्या दोन आठवड्यात हे पैसे दिले जाऊ शकतात. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या महिलांना मिळणार नाही पैसे (These Women Will Not Get Ladki bahin Yojana Installment)

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाहेर जाऊन अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना पैसे मिळणार नाहीत. या योजनेसाठी सुरुवातीपासूनच काही नियम निश्चित करण्यात आले होते.

या योजनेत फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेतील महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या घरी चारचाकी वाहन नसावे. महिला सरकारी कर्मचारी नसावे, या सर्व निकषात जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT