Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

Ladki Bahin Yojana June Month Installment Come From Today: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून जूनचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत जून महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता महिलांच्या खात्यात आता जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात (Ladki Bahin Yojana June Month Installment Come From Today)

काल रात्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरु असं त्यांनी म्हटलं आहे. या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. असं त्यांनी म्हटलं आहे.

जूनचे पैसे जमा झाले की नाही असं करा चेक

लाडकी बहीण योजनेत आजपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २-३ दिवसात सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्हाला फक्त आधार लिंक्ड बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन बॅलेंस चेक करायचा आहे. किंवा ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला पैसे आले की नाही हे चेक करु शकतात.

या महिला लाडकी बहीण योजनेतून बाद

लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांना बाद केले जाणार आहे. ज्या महिलांनी नियमांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना योजनेतून बाद केले जाणार आहे. याआधीही ज्या सरकारी महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेतून बाद केले आहेत. तब्बल अडीच हजारांपेक्षा जास्त महिलांना योजनेतून बाद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT