Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana : जून महिन्याचा हप्ता जमा; या महिलांचा 1500 रुपयांचा लाभ बंद, कारण जाणून घ्या

Maharashtra Government Scheme : लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता जमा झाला आहे. मात्र ई-केवायसी, उत्पन्न मर्यादा आणि पात्रतेच्या पडताणीमुळे काही महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आत्तापर्यंत सर्व लाभार्थी महिलांना देण्यात आला होता. नुकताच जून महिन्याचा हप्ता लाडकीच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र त्यामध्ये काही महिलांना योजनेचा लाभ मिळालाच नाही. यामागचं कारण समोर आलं आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) जून महिन्याचा हप्ता १५ जुलैपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरूवात झाली. या योजनेचा लाभ राज्यातल्या लाखो महिला घेतात. त्यांना दर महिना १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण या महिन्यात एकूण ९२ लाख महिलांची नावं योजनेतून वगळल्याची चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला. यानंतर अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितलं की, ९२ लाख महिलांची नावं एकाच वेळी वगळण्यात आलेली नाहीत. सध्या राज्यात ई-केवायसी पूर्ण केलेल्या १.६७ ते १.७० कोटी पात्र महिलांना नियमितपणे योजनेचा लाभ दिला जातो.

सरकारकडून लाभार्थ्यांची सातत्याने पडताळणी केली जाते आहे. या पडताळणीत ई-केवायसी न केलेल्या, उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या, सरकारी सेवेत असलेल्या तसेच अपात्र ठरणाऱ्या अर्जदारांची नावे योजनेतून वगळली गेली आहेत. काही प्रकरणांमध्ये पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. अशा अर्जांवरही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT