

लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नुकतंच ९२ लाख महिलांचा लाडकीचा लाभ वगळण्यात आला होता. त्यातच सरकारने आणखी एक दणका दिलाय. लाडक्या बहिणींची मोफत साडी वाटप योजना बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या २५ लाख कुटुंबांना यंदाच्या दिवाळीत मोफत साडी मिळणार नाहीये.
लाडकी बहीण योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या करोडो महिला घेत होत्या. यामध्ये ई-केवायसी प्रोसेस झाल्यानंतर आत्तापर्यंत ९२ लाख महिलांचा लाभ वगळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना दरमहा मिळणारे १५०० रुपये बंद झाले. त्यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी २०२३ मध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना सुरू केली होती.
पण Captive Market Scheme ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या २५ लाख कुटुंबांना यंदाच्या दिवाळीच मोफत साडी मिळणार नाही.
तसेच यासाठी शासनाकडून दरवर्षी १०० कोटी रुपयांची वार्षिक तरतूद केली जात होती. सन २०२३,२०२४ आणि २०२५ अशी सलग तीन वर्षे महिलांना साड्या देण्यात आल्या होत्या. पण चालू वर्षात ही योजना पूर्णपणे बंद केल्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये गरीब कुटुंबातल्या महिलांना शासनाकडून मिळणारी हक्काची साडी मिळणार नाही, अशी माहिती वस्त्रोद्योग विभागतल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरूच असणार आहे. नुकताच लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आलेला आहे. हा हप्ता १५ जुलै रोजी महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे. तर याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.