Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जुलैचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

Majhi Ladki Bahin Yojana July Month Installment: लाडकी बहीण योजनेत आता जुलैचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न महिला विचारत आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. आता महिलांना जुलैच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता येत्या काही दिवसांत जमा होण्याची शक्यता आहे. जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे महिना संपण्याआधी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. (Ladki Bahin Yojana News)

जुलैचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana July Month Installment Date)

जुलै महिना संपायला अलघे ९ दिवस उरले आहेत. त्यामुळे या दिवसांत कधीही खात्यात पैसे जमा होऊ शकतात. लाडक्या बहि‍णींना जूनचा हप्ता उशिरा मिळाला होता. त्यामुळे हा जुलैचा हप्तादेखील उशिरा मिळणार का, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. जुलैचे १५०० रुपये खात्यात कधी येणार याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात.

या लाडक्या बहि‍णींना मिळणार नाहीत पैसे (Thesw Women Wont Get Ladki Bahin Yojana Benefits)

लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, जर महिला सरकारी कर्मचारी असतील किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांनाही या योजनांचा लाभ मिळणार नाही. महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे. जर या निकषांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT