Ladki Bahin Yojana: नोंदणी बंद, 80 हजार अर्जही बाद, लाडकी बहिण दुहेरी संकटात

Eligibility Issues And Technical Errors: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी आहे... कारण आता लाडकी बहीण दुहेरी संकटात सापडलीय... नेमकं हे दुहेरी संकट काय आहे?
Women protest as registration halts and thousands of applications are rejected under Ladki Bahin Yojana in Maharashtra
Women protest as registration halts and thousands of applications are rejected under Ladki Bahin Yojana in MaharashtraSaam Tv
Published On

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी आहे. लाडकी बहिण आता दुहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे पोर्टलवर नव्या अर्जांची नोंदणी बंद आहे. तर दुसरीकडे निकषात न बसल्यानं हजारो अर्ज बाद झालेत.

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं जवळपास 80 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केलेत. तांत्रिक त्रुटी असल्यामुळे तसेच निकषात न बसल्यानं अर्ज बाद झालेत.

त्यामुळे अनेक महिलांना या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहावं लागणारेय. तर दुसरीकडे गेल्या सप्टेंबरपासून अर्ज नोंदणीचं पोर्टलही बंद करण्यात आलंय. त्यामुळे नव्यानं पात्र असणाऱ्या महिला लाभापासून वंचित आहेत. जुलै 2024 मध्ये ज्या महिलांचं वय 21 वर्षे पूर्ण झालीयत त्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही. त्यामुळे सरकारविरोधात आता महिलांकडून संताप व्यक्त होतोय. यावरुन विरोधकही आक्रमक झालेत. गरज सरो आणि वैद्य मरो अशा शब्दात काँग्रेसनेही महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय.

या योजनेची वर्षपूर्ती होत आहे. या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जारी करण्यात आला होता. मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोरपणे तपासणी सुरु आहे. शासनाच्या दोन योजनांचा लाभ, चारचाकी असणे, उत्पन्न जास्त असणे असे निकष लावल्यानं लाखो लाडक्या अपात्र ठरल्या आहेत. दुसरीकडे सरकारी नोकरी असूनही 'लाडकी बहिण' योजनेचा लाभ लाटणाऱ्या सुमारे सव्वा दोन हजार कर्मचाऱ्यांचाही लाभ बंद झाला आहे. तसंच ज्या महिलांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधीची रक्कम मिळते त्यांना योजनेच्या जीआर नुसार 500 रुपये मिळतात.

विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरु न झाल्यास त्याचे पडसाद उमटण्याची शक्यताय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com