Ladki Bahin Yojana google
बिझनेस

Ladki Bahin Yojana: तब्बल इतक्या लाख महिला झटक्यात योजनेतून बाहेर, अधिकृत डेटा जाहीर, तुमचे नाव यात नाही ना?

Ladki Bahin Yojana July installment date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे ६६ लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आली आहेत. राज्य सरकारने अधिकृत आकडेवारी जाहीर करत १.६६ कोटी महिला सध्या पात्र असल्याचे स्पष्ट केले आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Ladki Bahin Yojana e-KYC latest update : महाराष्ट्रातील अत्यंत चर्चेत असलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे राज्यातील तब्बल ६६ लाख महिलांना या योजनेच्या लाभार्थी याजीतून बाहेर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी स्पष्ट केली आहे.

१.६६ कोटी महिला ठरल्या पात्र

राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सध्या राज्यात १ कोटी ६६ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. महिला व बालविकास विभागाने पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

ही योजना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विभागांतर्गत येते. पात्र ठरलेल्या आणि ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिलांनाच या योजनेचा नियमित आर्थिक लाभ दिला जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

कधी काय घडले?

२८ जून २०२४: राज्य सरकारने या योजनेला अधिकृत मंजुरी दिली.

१७ ऑगस्ट २०२४: योजनेचा राज्यभरात भव्य शुभारंभ झाला. (या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात.)

नोव्हेंबर २०२५: योजनेतील गैरप्रकार आणि बनावट अर्ज रोखण्यासाठी सरकारने 'ई-केवायसी' (e-KYC) करणे बंधनकारक केले.

३० एप्रिल २०२६: सर्वरच्या तांत्रिक अडचणींमुळे महिलांना त्रास होऊ नये म्हणून मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी करण्याची मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवली होती.

ई-केवायसी का आवश्यक ठरली?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी ही योजना 'गेमचेंजर' ठरली होती. सुरुवातीला महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी ही योजना सुरू केली होती. मात्र, योग्य आणि गरजू महिलांपर्यंतच या योजनेची रक्कम पोहोचावी, यासाठी ई-केवायसी ही मोहीम राबवण्यात आली. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करू शकल्याने ६६ लाख महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.

जुलै महिन्याचा लाभ कधी जमा होणार?

राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात १५ जुलै रोजी जून महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे. ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत लाडक्या बहिणींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : नव्या गोष्टी अनुभवाल, या ५ राशींचा ताण वाढणार की कमी होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

मगरीच्या हल्ल्याचा थरार, आईसाठी मुलगी थेट मगरीशी भिडली

भारतात 2027 मध्ये कमी पाऊस, 100 वर्षातील सर्वात भयंकर स्थिती

I Phone चे हप्ते थकले, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

हॉस्टेलवाले प्रेगन्सी टेस्ट करायला लावतात; आदिवासी मुलीने सांगितली हॉस्टेलमधील धक्कादायक बाब

SCROLL FOR NEXT