Ladki Bahin Yojana  Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचे ₹१५०० जमा झाले, तुम्हाला आले का?

Ladki Bahin Yojana January Installment ₹1500 Recieved: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात आता जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

₹१५०० तुम्हाला आले का?

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरीही खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर आता सरकारने थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) पहिल्याच दिवशी लाभार्थी महिलांना अनपेक्षित गिफ्ट मिळालं आहे. त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे. जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

जानेवारीचे पैसे जमा (Ladki Bahin Yojana January 1500 Rupees Installment Recieved)

जानेवारी महिना संपला, आता फेब्रुवारी महिनादेखील संपत आला आहे. तरीही दोन्ही महिन्याचा लाभ मिळाला नव्हता. यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान, जानेवारी-फेब्रुवारीचे पैसे एकत्र येतील, असं सांगितलं जात होते. त्यानंतर आता एकाच महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. जानेवारीचे १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

या महिलांना मिळणार पैसे (Ladki Bahin Yojana These Women Will Get Money)

लाडकी बहीण योजनेत पात्र महिला ज्यांनी ईकेवायसी केली आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ईकेवायसी करण्याची मुदत आता संपली आहे. दरम्यान, ईकेवायसीमध्ये चुका असल्याने अनेक महिलांना मागच्या महिन्याचाही लाभ मिळाला नव्हता. त्या महिलांना या महिन्यातदेखील पैसे मिळणार नाहीत. त्यांना मार्च महिन्यानंतर रखडलेले हप्ते एकत्रितपणे दिले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT