Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana January Installment Date: लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

जानेवारीचा हप्ता कधी येणार?

पुढच्या महिन्यात येऊ शकतात पैसे

जानेवारी महिना संपत आला आहे. पुढच्या महिन्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत. त्याआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.डिसेंबरपर्यंतचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

जानेवारीचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana January Installment Date)

जिल्हा परिषद निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे हा हप्ता येण्यास उशिर होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५ फेब्रुवारीला होणार होत्या. दरम्यान, आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे हप्ता आता कधी येणार की आणखी लांबणीवर जाणार असा प्रश्न विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यासाठी कोणतीही पाऊले उचलण्यात आल्याचे दिसत नाहीये. यामुळे जानेवारीचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहि‍णींची पडताळणी सुरु

लाडकी बहीण योजनेत महिलांची प्रत्यक्ष पडताळणी सुरु आहे. अनेक महिलांनी केवायसी करुनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. केवायसीमधील प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT