How to correct eKYC errors in Maharashtra women scheme : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा eKYC प्रक्रिया सुरू केली आहे. पण ही सर्वांसाठी नाही. तर फक्त 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेसाठी ज्या महिलांनी आधी अर्ज भरलेला आहे अन् त्यात चूक झालेली आहे. त्या महिलांना चूक दुरूस्त करण्याची संधी राज्या सरकारने दिली आहे. ज्या महिलांचं ई केवायसी राहिलेय, त्यांना आता ई केवायसी करता येणार नाही.
ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरताना eKYC प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते, अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने पोर्टलवर दुरुस्तीची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या महिलांना ईकेवायसी करता आलेली नाही, त्यांना यापुढे १५०० रूपयांचा लाभ मिळणार नाही. ईकेवायसी करताना ज्या महिलांकडून चूक झाली आहे, त्या महिलांना दुरूस्तीची संधी राज्य सरकारने दिली आहे. त्याच महिलांनी पोर्टलवर जाऊन दुरूस्ती करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
"ही eKYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते." असा मेसेज पोर्टलवर असल्याचे दिसतेय. त्यामुळेच फक्त दुरूस्तीच करता येणार आहे. लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्न बँक खाते आणि योग्य eKYC असणे अनिवार्य आहे. ज्या महिलांचे अर्ज त्रुटींमुळे प्रलंबित होते किंवा ज्यांचे eKYC चुकले होते, त्यांनी तातडीने पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाची दुरूस्ती केल्यावरच रखडलेल्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होणार आहे.
राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाचवेळी सहा हजार रूपये जमा होण्याची शक्यता आहे. होय.. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च.. या चार महिन्यांचे हप्ते एकाचवेळी वितरीत होऊ शकतात, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यात खात्यात जमा झाला होता. त्यानंतर एकाही हप्त्याची रक्कम खात्यात आलेली नाही. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. पण लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमुळे डिसेंबर महिन्यापासूनचे हप्ते रखडले आहे.नवीन आर्थिक वर्षात रखडलेले हप्ते एकत्र जमा होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.