Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार; जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana January-February Installment May Come Together: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट

जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार?

३००० रुपये कधी जमा होणार?

जानेवारी महिना संपून आता फेब्रुवारी महिन्याचाही पहिला आठवडा संपला आहे. तरीही महिलांच्या खात्यात अजून जानेवारीचा हप्ता आलेला नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान,जानेवारीचेच पैसे जमा झालेले नाहीत. त्यानंतर आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट महिला बघत आहेत. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचेही बोलले जात आहे.

जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana January-Februaru Installment May Come Together)

फेब्रुवारी महिना सुरु झाला आहे. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. जिल्हा परिषद निवडणूकीआधी जानेवारीचा हप्ता जमा होणार होता. मात्र, निवडणुकीसाठी मतदान होऊन गेले तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचसोबत अनेक महिलांचा लाभ रखडल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषद निवडणूकीनंतर येणार पैसे (Ladki Bahin Yojana Installment Come After ZP Election)

लाडकी बहीण योजनेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी एक हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा दोन्ही हप्ते जिल्हा परिषदेच्या निवडणूकीनंतरच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कधीही महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.

केवायसीतील दुरुस्तीसाठी मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीची माहिती भरली आहे. चुकीची माहिती भरल्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने या अडचण निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, आता त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. महिलांना ईकेवायसी दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

ST Bus Accident: काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; भंडाऱ्यात नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT