Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना झटका! मकरसंक्रांतीला जानेवारीचे ₹१५०० मिळणार नाहीत; वाचा अपडेट

Ladki Bahin Yojana January Installment will not Come: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता सध्या येणार नाहीये. महिलांना ३००० रुपये एकत्र येणार नाहीत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

जानेवारीचा हप्ता येणार नाही

३००० ऐवजी फक्त १५०० रुपये जमा होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाहीये. महापालिका निवडणुकीआधी महिलांना ३००० रुपये येणार नाहीयेत. राज्यातील महापालिका निवडणुकीआधी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता महिलांना फक्त एकच हप्ता दिला जाणार आहे. महिलांच्या खात्यात फक्त १५०० रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे महिलांना निराशा झाली आहे.

लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर-जानेवारीचा हप्ता एकत्र दिला जाऊ नये, यासाठी काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे धाव घेतली होती. आचारसंहितेच्या काळात अग्निम स्वरुपाचा लाभ कसा देता येईल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आयोगाकडून स्पष्ट भूमिका घेतली आहे. वेळेआधी तुम्ही योजनेचा हप्ता देऊ शकत नाही, असं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे. यामुळे आता लाडक्या बहि‍णींना फक्त डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या? (Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana)

आदिती तटकरेंना लाडकी बहीण योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या की, विरोधकांना सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही खटकत आली आहे. महायुतीने सुरुवात केलेल्या या योजनेला घोषित झालेल्या दिवसापासून या योजनेला विरोध झालेला आहे. महिलांसाठी पहिल्यांदाच ही योजना आली आहे. पंधराशे रुपयांचा आम्ही लाभ घेत असतो,जवळपास वर्ष उलटून गेली आहे ही योजना आम्ही राबवत आहोत.

आता ही रेगुलर स्कीम आहे. आयोगाने या संदर्भात आमच्या विभागाला विचारणा केली होती. या संदर्भातला योग्य तो खुलासा आणि स्पष्टीकरण शासनाच्या माध्यमातून निवडणूक विभागाला दिलं आहे. आम्ही कुठेही आचारसंहितेचा भंग करून किंवा निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाचा उल्लंघन करून आम्ही कुठलीही योजना राबवीत नाही. एखादी स्कीम जर महिलांना आनंद देणारी असेल तर त्याचा लाभ जर गरजू महिलांपर्यंत पोहोचत असेल तर एखाद्या गोष्टीवर दहा वेळा आक्षेप घेऊन आपण लाडक्या बहिणींना नाराज करत आहोत असं मला वाटतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

Amruta Deshmukh: साडीत उंदीर,घाणेरडं वॉशरुम; पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दयनीय अवस्थेवर मराठी अभिनेत्री संतापली

Braid Hairstyle: फंक्शन किंवा लग्नाला साधा अंबाडा बांधण्यापेक्षा ट्राय करा हे ५ सुंदर वेणीचे प्रकार

Rasmalai Recipe : मकर संक्रांत स्पेशल रसमलाई, घरीच १० मिनिटांत मिठाई तयार

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

SCROLL FOR NEXT