ladki bahin yojana  Saam tv
बिझनेस

लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

ladki bahin yojana news : अनेक अपात्र महिलांना लाडकीचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेची महत्वाची अपडेट समोर

ई-केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींची धावाधाव सुरू

ई-केवायसीबाबत सरकारी अधिकाऱ्यांचं मोठं भाष्य

अक्षय शिंदे, साम टीव्ही

राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहि‍णींना पैसे येण्यास सुरुवात झालीये. अनेक पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहे. दुसरीकडे या योजनेतून ७० लाख महिलांना योजना वगळण्यात आलं आहे. ई-केवायसी न केल्याने पैसे खात्यात जमा झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ई-केवायसी करण्यासाठी महिलांची धावपळ वाढली आहे. मात्र, ई-केवायसी सुरू नसल्याचे स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रात विविध भागात अपात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकीचा हप्ता जमा झालेला नाही. जालन्यातही काही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे जालन्यातील शेकडो महिला सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या.

दुसरीकडे महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाकडून ईकेवायसी सुरू नसल्याचा फलक लावण्यात आला होता. ई-केवायसी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे ई-केवायसी सुरू नसल्याचं महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं.

ज्या महिलांची ईकेवायसी केलेली नाही , जोपर्यंत शासनाकडून लिंक येत नाही, तोपर्यंत वाट पहावी, असं अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र महिला व बाल विकास विभागाला शासनाकडून कोणताही अशा प्रकारचा आदेश आला नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अनेक लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा न झाल्याचं देखील काही महिलांनी सांगितलं.

ई-केवायसी पुन्हा सुरू होणार का?

काही पात्र महिलांनाही लाडकीचे पैसे आले नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे आम्हाला पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत, असा महिलांकडून केला जात आहे. यावर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. 'लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी होत राहील. त्यामुळे राज्यातील एकही पात्र लाडकी ओवाळणीपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावातील धरणगाव येथे गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत दुष्काळ जाहीर करण्याचे फलक

Chocolate Pastry Recipe: बर्थडेसाठी यावेळी घरीच बनवा मऊ, स्पाँजी चॉकलेटी पेस्ट्री, वाचा रेसिपी

Nail health: पिवळी नखं, काळी रेष...नखांवर दिसणारे हे 7 बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Gold Rate Today : सणासुदीच्या काळात सोनं महागलं, १ तोळ्याची किंमत किती? जाणून घ्या 22k, 18k, 24k चे ताजे दर

LPG Subsidy : १ ऑक्टोबरपासून LPG ग्राहकांसाठी नवा नियम; सबसिडी हवी असेल तर आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT