Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळून पतसंस्था सुरु करण्यास सांगितले होते.

Siddhi Hande

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी गाव, तालुका आणि जिल्ह्यात पतसंस्था सुरु करण्याच निर्णय झाला होता. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. जिल्ह्यात एकच पतसंस्था सुरु केली जाणार आहे. यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला मिळून ही पतसंस्था सुरु करणार आहेत.

ही पतसंस्था सुरु करण्यासाठी १५००० प्राथमिक महिला सभासद असायला हवे. याचसोबत १० लाख भांडवल आवश्यक आहे. दरम्यान, पतसंस्थेसाठी कोणीच पुढे येत नसल्याने या निर्णयाला ब्रेक लागला आहे.

राज्या शासनाने ८ मार्च २०१९ रोजी परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार निकषात बसणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येणार आहे. यामध्ये वॉर्ड विभागासाठी प्राथमिक महिला सदस्य १००० आण भांडवल १५ लाख रुपये, उर्वरित महानगरपालिका क्षेत्रासाठी प्राथमिक सदस्य ८००, नोंदणी करताना दहा लाख रुपये अशी अट आहे.

दरम्यान, मुंबई, नवी मुंबई महानगरपालिकासाठी दोन हजार आणि नोंदणी करताना ३० लाख रुपये भरायला हवे. तर इतर महापालिका क्षेत्रांसाठी सभासद संस्था १५०० आणि नोंदणी वेळी २० लाख रुपये भरावे लागणार आहेत. परंतु यासाठी कोणत्याही हिला पुढे आल्या नाहीत. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

बचत गटातील महिलांची मदत

लाडक्या बहि‍णींच्या सक्षमीकरणासाठी गावागावात, तालुक्यात पतसंस्था सुरु करण्याचे नियोजित केले होते. मात्र, महिला अपेक्षेप्रमाणे पुढे आल्या नाहीत. त्यामुळेच आता फक्त जिल्ह्यांमध्ये एक पतसंस्था सुरु करण्याचे नियोजन केले आहे, असं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खून करणाऱ्या प्रियसीला जन्मठेप,प्रियकरावर कुऱ्हाडीने केला होता वार

Kidney Detox Drinks: वेट लॉस ते किडनी Detox; 'या' भाज्याचं ज्यूस प्या, तब्येत राहिल फिट, आजार छुमंतर

Stomach cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी दिसतात 'हे' संकेत; सामान्य लक्षणं समजण्याची चूक करू नका

Accidnet News : सोलापुरात भीषण अपघात! २५ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल, डिव्हायडर तोडला अन्...

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!तुम्हाला पीएम किसानचे ₹२००० येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

SCROLL FOR NEXT