Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना आणखी एक संधी मिळणार; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Ladki Bahin Yojana Big Decision: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता लाडक्या बहिणींना आता महिला व बालविकास कार्यालयात कागदपत्र सादर करता येणार आहेत.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय

महिला व बालविकास कार्यालयात जाऊन सादर करता येणार कागदपत्र

लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहि‍णींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आता लाडक्या बहि‍णींना अजूनही कागदपत्र सादर करता येणार आहे. मुदत संपल्यानंतर कागदपत्र सादर करण्यासाठी निर्णय घेतला आहे. एकही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय (Ladki Bahin Yojana BIg Decision)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे बंधनकारक केले होते. दरम्यान, केवायसी करताना योग्य कागदपत्र सादर करु न शकलेल्या महिलांसाठी एक संधी देण्यात आली आहे. या महिला आता जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागात जाऊन ही कागदपत्र सादर करु शकतात.यानंतर पडताळणी केली जाईल. त्यानंतर महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरु केला जाईल.

लाडकी बहीण योजनेत दोन दिवसांपूर्वी मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. १ कोटी ७७ लाख लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये जमा केले गेले आहेत. या योजनेतून निकषात न बसणाऱ्या जवळपास ६६ ते ७६ लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या महिलांवर खर्च होणारे पैसे वाचणार आहे. जवळपास १० हजार कोटींपेक्षा जास्त रुपये वाचणार आहेत.

लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी

लाडकी बहीण योजनेत केवायसीच्या दुरुस्तीची शेवटची तारीख ३० एप्रिल होती. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या समोर आली. दरम्यान, ही महत्त्वाची प्रक्रिया जरी पार पडली असली तरीही कोणीही योजनच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या महिलांनी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यांनी महिला व बालविकास कार्यालयात जाऊन कागदपत्र सादर करायची आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

Manchurian Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी व्हेज मंच्यूरियन; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT