Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ...तर या लाडक्या बहिणींचे १५०० बंद होणार, सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Ladki Bahin Yojana E Kyc Process: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत ई केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय

लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे अनिवार्य

ई केवायसी केले नाही तर मिळणार नाही योजनेचा लाभ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे गरजेचे आहेत. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत तुम्हाला दोन महिन्यात केवायसी प्रोसेस पूर्ण करायची आहे. जर तुम्ही केवायसी पूर्ण केले नाही तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाचा निर्णय (Ladki Bahin Yojana E KYC Process)

लाडकी बहीण योजनेसंदर्भात केवायसीचा निर्णय घेतला आहे. याबाबत आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे. आता प्रत्येक वर्षी लाभार्थ्यांना केवायसी करावे लागणार आहे. जर तुम्ही केवायसीची प्रोसेस केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर केवायसी करा अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. यासाठीची संपूर्ण प्रोसेस ही ऑनलाइन असणार आहे. तुम्हाला वेबसाइटवर जाऊन हे काम करायचे आहेत.

केवायसी कशी करायची? (Ladki Bahin Yojana E Kyc Step By Step Process)

सर्वात आधी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जावा.

त्यानंतर तुम्हाला ई केवायसी ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

यानंतर आधार नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो टाकावा.

यानंतर तुमचे नाव यादीत आहे की नाही ते चेक केले जाईल त्यानंतर तुम्ही पुढच्या टप्प्यात जाऊ शकता.

यानंतर तुम्हाला विचारलेली माहिती भरावी लागणार आहे. यामध्ये तुम्ही सरकारी कर्मचारी नाहीत ना, विवाहित आहात की नाही ही माहिती भरावी लागेल.

ही माहिती भरल्यानंतर तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण होईल. त्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करा.

जर तुमची आधीच केवायसी पूर्ण झाली असेल तर केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असं येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bottled water safety: बाटलीबंद पाणी किती दिवस सुरक्षित असतं? एक्सपायरी डेटमागचं खरं कारण जाणून घ्या

Maharashtra Live News Update: लातूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात, ३ जणांचा मृत्यू

Summer Season Daily Wear Saree: उन्हाळ्याच्या डेली युजसाठी कोणत्या साड्या बेस्ट?

राजकारणात उलथापालथ होणार; भाजपची सुपरस्टार अभिनेत्याला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

Gudi Padwa 2026 : सणासुदीला घाईगडबडीत फक्त ५ मिनिटांत करा मेकअप, 'या' ३ स्टेप्समध्ये चेहरा दिसेल उजळ

SCROLL FOR NEXT