Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींनी चिंता करू नका, लाडका भाऊ इथेच बसलाय”, एकनाथ शिंदे यांचा दिलासा|VIDEO

No Confusion in E-KYC, Says Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेतील महिलांना दिलासा दिला. ई-केवायसीमुळे पारदर्शकता वाढेल व महिलांच्या खात्यात वेळेवर पैसे जमा होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक गैरप्रकार आढळले होते. अनेक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा फायदा घेतल्याचे समोर आले होते. तर काही पुरुषांनी देखील या योजनेचा अर्ज भरून डल्ला मारल्याचे उघडकीस आले होते. यानंतर या योजनेत पारदर्शकता राहावी म्हणून सरकारने E-KYC करणे अनिवार्य केले. यामध्ये महिलांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड संदर्भात माहिती अपडेट करावी लागणार आहे.

मात्र, यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम देखील पसरलाय. यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेय, E-KYC वरून कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेवू नये, यामुळे आणखी सुलभता आणि पारदर्शकता येईल आणि लाडक्या बहीण योजेनचे पैसे महिलांच्या खात्यात वेळेवर जमा होतील. आणि विरोधकांच्या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये असे असे म्हणत लाडक्या बहीणींनी चिंता करू नये त्यांचा लाडका भाऊ इथे बसला आहे असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी लाभार्थी महिलांना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com