Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojana February Installment : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा

देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा

पुढच्या ३ दिवसात सर्व महिलांना मिळणार पैसे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिना संपायला आला तरीही महिलांना मागच्या महिन्याचा हप्ता न मिळाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली होती. त्यानंतर लाडक्या बहिणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मोठी घोषणा केली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (CM Devendra Fadnavis Big Announcement on Ladki Bahin Yojana)

देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत माहिती दिली आहे.आमच्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील आमच्या सर्व पात्र बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली असून, पुढच्या 3 दिवसांत हा निधी त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा होईल.लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

३ दिवसात सर्व लाभार्थ्यांना मिळणार पैसे (Ladki Bahin Yojana February Installment Recieved)

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. पुढच्या ३ दिवसात सर्व लाभार्थी महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पैसे आले की नाही हे चेक करा. महिलांच्या खात्यात हळूहळू पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहे. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT