Aditi Tatkare Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: पडताळणीसाठी लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले का? आदिती तटकरेंनी दोन शब्दात विषय संपवला

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान, आता योजनेतील निकष बदलल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता यावर आदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी सुरु?

लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले?

आदिती तटकरेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. दरम्यान, यातून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांचा संताप व्यक्त केला आहे. या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला होता. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले असल्याची चर्चा होत आहे. आता यावर स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदिती तटकरे काय म्हणाल्या? (Aditi tatkare on Ladki Bahin Yojana)

आदिती तटकरेंनी सांगितले की, निकष कधीही या योजनेचे बदललेले नाहीत. निकष तेच आहेत. डेटा व्हेरीफिकेशन ही सततची प्रकिया आहे. आम्हाला अनेक विभागाकडून डेटा मिळाला आहे.हा डेटा मिळाल्यानंतर आम्ही क्रॉस व्हेरीफिकेशन केलं. एखाद्या आठवड्यात आम्हाला सर्व जिल्ह्यातून एकत्र केलेली माहिती मिळेल. यातून थांबवण्यात आलेल्या महिलांना लाभ मिळेल पात्र महिलांना लाभ मिळेल. जे अपात्र ठरतील त्यांना माहीत होत की ते अपात्र ठरणार. पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही ही आमच्या विभागाची भूमिका आहे.

आतापर्यंत किती महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ?(Ladki Bahin Yojana Beneficiaries List)

लाडकी बहीण योजनेत किती लाभार्थ्यांनी लाभ घेतला याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे. दरम्यान, रोज वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे. त्यावरही आदिती तटकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.कुठल्या तरी एका पोर्टलने फेक केलेली बातमी आहे.2 कोटी 63 लक्ष ही नोंदणीची आकडेवारी आहे.लाभार्थ्यांची आकडेवारी नाही. आजही लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 30 लाखांपेक्षा अधिक आहे.2कोटी 30 लाखांपेक्षा संख्या कमी झालेली नाही, असं त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope:आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra weather : महाराष्ट्रात थंडी नेमकी कधी सुरू होईल? हवामानाचा अंदाज काय सांगतोय? जाणून घ्या

Latur News: शेत रस्त्याच्या वादावरून तिघांना जबर मारहाण.. कोयता, लाठ्याकाठ्यांनी हाणामारी|VIDEO

Cancer: तुमच्या किचनमधील 'हे' पदार्थ कॅन्सरपासून करतील बचाव, आरोग्यासाठी ठरतील वरदान

Avneet Kaur: अवनीत कौरचा ग्लॅमरस दिवाळी लूक, बर्थडेला पोस्ट केले खास फोटो

SCROLL FOR NEXT