Ladki Bahin Yojana eKYC Scam Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana eKYC Scam: लाडकींनो सावध व्हा, मोठा स्कॅम आला समोर, e-KYC करताना फसवणूक, खातं रिकामं होईल

Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. परंतु आता केवायसीच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते. अनेक फेक वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य

केवायसी करताना अधिकृत वेबसाइटवरुन करा

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीच्या नावाखाली होतेय फसवणूक

लाडकी बहीण योजनेत आता सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी अनिवार्य केले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांना केवायसी करावी लागणार आहे. यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायचे आहे. यासाठी सरकारने अधिकृत वेबसाइट दिली आहे. मात्र, अनेक फेक वेबसाइट तयार झाल्याचे समोर आले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त अधिकृत वेबसाइटवरुन केवायसी करण्यास सांगितले आहे. मात्र, आता अनेक खोट्या वेबसाइट तयार झाल्या आहेत. त्यामुळे महिलांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. महिलांच्या खात्यातून पैसे काढून घेऊ शकतात. त्यामुळे महिलांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

लाडकी बहीण योजनेत आता दरवर्षी ई केवायसी करावी लागणार आहे. महिलांना जून महिन्यात केवायसी करावी लागणार आहे. २६ लाखांपेक्षा जास्त महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. त्यानंतरच केवायसी करण्याचा निर्णय घेतला.

लाडकीच्या नावाखाली फसवणूक

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनच केवायसी करावे. तुम्ही गुगलवर जर लाडकी बहीण योजना ई केवायसी प्रोसेस सर्च केलं तर कोणती तरी वेगळीच वेबसाइट ओपन होत आहे. या वेबसाइटवर तुम्ही माहिती भरली की तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या बँक अकाउंटची सर्व माहिती फ्रॉड करणाऱ्यांकडे जाऊ शकते. यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ई केवायसी करताना विशेष काळजी घ्या. नेहमी केवायसी करताना अधिकृत वेबसाइटवर जाऊनच करा. याबाबत मंत्री आदिती तटकरेंनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलेल्या प्रोसेसप्रमाणेच केवायसी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Puri Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट तयार करा चटपटीत दही पुरी रेसिपी

Cotton Saree Contrast Blouses: साध्या कॉटन साडीला स्टायलिश लूक देणार 5 कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन

Maharashtra Live News Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

Makar Sankranti: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

SCROLL FOR NEXT