Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana Update: ₹१५०० बंद झालेल्या महिलांना दिलासा, लाडक्या बहि‍णींची पुन्हा होणार ईकेवायसी, प्रोसेस झाली सुरू

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. त्यानंतर आता या महिलांसाठी पुन्हा केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

केवायसीतील चुकीमुळे लाखो महिलांचे लाभ बंद

आता या महिलांची पुन्हा केवायसी होणार

लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. ई केवायसी करुनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे ई केवायसीत झालेली चूक. दरम्यान, लाखो महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. यानंतर आता महिलांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

ई-केवायसी करुनही लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याच्या खूप तक्रारी समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता लाभ बंद झालेल्या महिलांची प्रत्यक्ष फेरपडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहे. यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.

लाभ बंद झाल्याने महिलांमध्ये होती नाराजी

ज्या महिलांचे लाभ बंद झाले आहेत अशा महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लाभार्थ्यांनी पुन्हा ई केवायसी करा, अशी मागणी केली होती. यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महिलांची फेर ई केवायसी होणार आहे. या निर्णयामुळे महिलांना पुन्हा एकदा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

शासनाने फेर ई केवायसीचा निर्णय घेतल्याने महिलांना पुन्हा एकदा लाभ मिळणार आहे. केवायसीमध्ये ज्या महिला निकषांमध्ये बसतात त्यांच्यासाठी योजनेचा लाभ असाच सुरु राहणार आहे. यामध्ये महिलांचे उत्पन्न, घरातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना, एकाच कुटुंबातील किती जण योजनेचा लाभ घेतात, या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच लाभ सुरु ठेवायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : अंबरनाथमध्ये चायनीजच्या दुकानातून घातक हत्यारं हस्तगत

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या' दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

SCROLL FOR NEXT