Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनी eKYC केली तरी डिसेंबरचे ₹१५०० आले नाही; कारण काय?

Ladki Bahin Yojana eKYC Update December Installment Not Recieved: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, काही महिलांना केवायसी करुनही पैसे मिळाले नाहीत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाटी महत्त्वाची बातमी

केवायसी केले तरीही डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही

डिसेंबरचा हप्ता न येण्यामागची कारणे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, यामध्येदेखील अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. यामागचे कारण म्हणजे केवायसी, असं सांगितलं जात आहे. मात्र, अनेक महिलांनी केवायसी करुनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

केवायसी करुनही या महिलांना पैसे नाही (Ladki Bahin Yojana eKYC Done But still not get Money)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर निश्चित केली होती. तोपर्यंत ज्या महिलांनी केवायसी केले त्यांचाचा लाभ अखंडितपणे सुरु राहिल, असं सांगितलं होतं. दरम्यान, नवीन आर्थिक वर्षापासून केवायसी न केलेल्या महिलांना पैसे मिळणार नाही, असं सांगितलं होतं. मात्र, आतापासूनच महिलांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले आहे.

लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांनी केवायसी केली असूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामागचे कारण म्हणजे निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत. केवायसी केल्यानंतर महिलांबाबत सर्व माहिती मिळते. महिलांच्या वडिलांची किंवा पतीची केवायसी केल्यामुळे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कळते. दरम्यान, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

जानेवारीचा हप्ता कधी? (Ladki Bahin Yojana January Installment Date)

लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता उशिरा जमा झाला. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. हा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. झेडपी निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधी लग्न लपवलं, रहस्य उघडकीस आलं अन् प्रेयसीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, क्रूर कृत्याने संतापाची लाट

MPSC Recruitment: MPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ग्रुप-सीच्या २,६१९ पदांसाठी बंपर भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Monsoon Health Care: पावसाळ्यात वारंवार पोट बिघडतंय? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

SCROLL FOR NEXT