Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! eKYC ची मुदत पुन्हा वाढवली, आदिती तटकरेंकडून लाडक्या बहि‍णींना गिफ्ट

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended Aditi Tatkare Announcement: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी मोठी घोषणा केली आहे. आता लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी

ईकेवायसी दुरुस्तीची मुदत वाढवली

आता लाडक्या बहिणींना या तारखेपर्यंत करता येणार केवायसी

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी ईकेवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ३१ एप्रिलपर्यंत केवायसी करण्याची मुदतवाढ दिली आहे. ज्या महिलांनी अजूनही केवायसीतील चुका सुधारल्या नाहीत त्यांच्याकडे ही शेवटची संधी आहे. पुढच्या महिन्याभरात तुम्हाला केवायसी करायची आहे.

आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या? (Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extended)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु आहे. काल ३१ मार्च रोजी ईकेवायसीठीची मुदत संपली होती. परंतु यासंदर्भात काही निवेदने आमच्याकडे प्राप्त झाली होती. ईकेवायसीसंदर्भातील काही तक्रारी होत्या. अजून मुदत देण्याची मागणी केली होती. मधल्या कालावधीत गारपीट किंवा काही अडचणींमुळे अनेक महिलांची केवायसी करायची राहिली होती. ईकेवायसी सप्टेंबर महिन्यात सुरु झाली होती. यासाठी दोन महिन्याची मुदत दिली होती.यानंतर मुख्यमंत्री, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली ईकेवायसीसाठी मुदत वाढवून दिली होती. त्यानंतर अनेकांनी चुकीची माहिती भरली होती.काहींना तांत्रिक बाबींमुळे लाभ मिळत नव्हता.

अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. यासाठी आता ईकेवायसीची मुदत वाढवत आहोत. या महिन्याभराचा कालावधी आहे. ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी यांच्या सूचनेप्रमाणे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. ईकेवायसी करताना जर काही चुका झाल्या असतील तर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलांना ३० एप्रिलपर्यंत केवायसी करायची आहे, असं मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT