Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मुदत वाढली पण वेबसाइट सुरळीत कधी चालणार? लाडक्या बहि‍णींसमोर OTPचा प्रश्न कायम, काय कराल?

Ladki Bahin Yojana EKYC Process: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, अजूनही वेबसाइटवर तांत्रिक अडचणी येत आहे. त्यामुळे महिलांनी आता काय करावे असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ

केवायसी करण्यात तांत्रिक अडचणी

लाडक्या बहिणींनी केवायसी कशी करायची?

२०२४ मध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेत महिलांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे. दरम्यान, आता यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. महिला ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी पूर्ण करु शकतात.दरम्यान, अजूनही महिलांना केवायसी करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लाडकी बहीण केवायसीत तांत्रिक अडचण, काय करावे? (Ladki Bahin Yojana KYC Problems)

लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ दिली असली तरीही महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिलांना केवायसी करताना वेबसाइट अनेकदा क्रश होत आहे. साइटमध्ये एरर येतोय. त्यामुळे प्रोसेसच पूर्ण होत नाहीये. यामुळेच महिलांची केवायसी पूर्ण होत नाहीये. याचसोबत महिलांना ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे. खूप वेळ ओटीपी येत नाही.

तांत्रिक अडचणी येण्यामागचे कारण म्हणजे एकाचवेळी अनेकजण साइटवर केवायसी करत आहे. यामुळे यावर उपाय म्हणून तुम्ही रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीत केवायसी करण्याचा सल्ला दिला आहे. या काळात साइटवर लोड कमी असतो. त्यामुळे महिलांची केवायसी अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल.

eKYC कशी करायची? (Ladki Bahin Yojana EKYC Link)

सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

तिथे स्क्रिनवर तुम्हाला ईकेवायसी असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

यानंतर तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

जर तुमची केवायसी आधीच पूर्ण झाली असेल तर तसा मेसेज तुम्हाला येईल.

यानंतर तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे. यानंतर ओटीपी येईल. तो टाकावा.

यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्मवर क्लिक करा.

यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turmeric Milk: थंडीत १ ग्लास दुधामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा, या डोकेदुखी आजारावर घरीच मिळेल आराम

Case Against Actor: रेप केसमध्ये अडकलेल्या प्रसिद्ध अभिनेत्यावर आणखी एक गुन्हा दाखल, यावेळी कोणते नविन आरोप

Team India: गंभीर-गिलमध्ये वादाची ठिणगी? टीम इंडियातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मतभेदांचं कारण चर्चेत

Pune Winter Tourism: हिवाळ्यात फिरायला कुठे जाल? पुण्याजवळ आहेत 8 Hidden सुंदर पिकनिक स्पॉट्स, जाणून घ्या

रूग्णवाहिकेनं मध्यरात्री घेतला पेट, नवजात बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू, घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT