Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: मतदानाआधी लाडकीच्या खात्यात डिसेंबरचे ₹१५०० जमा, आता जानेवारीचा हप्ता कधी येणार?

Ladki Bahin Yojana January Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. डिसेंबरचे पैसे जमा करण्यात आले. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

मकरसंक्रांतीआधी डिसेंबरचा हप्ता जमा

जानेवारीचे १५०० रुपये कधी येणार?

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मकरसंक्रांतीला पैसे दिले आहेत. त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. जानेवारी महिन्यात दोन हप्त्याचे पैसे एकत्र दिले जातील, असं सांगितलं जात होतं. मात्र, आता फक्त एकच हप्ता दिला आहे. यामुळे महिलांच्या मनात थोडीसी निराशा निर्माण झाली आहे.

डिसेंबरचे पैसे मिळाले, जानेवारीच्या हप्त्याचं काय? (Ladki Bahin Yojana When will January Installment Come)

लाडकी बहीण योजनेत मकरसंक्रांतीला महिलांना खुशखबर दिली आहे.दरम्यान, दोन हप्ते एकत्र येतील असं वाटतं होतं. मंत्र्यांनी त्याबाबत घोषणा केली होती. याबाबत काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यावर निवडणुक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली. महिलांना अग्निम पैसे दिले जाऊ नये, असं त्यांनी सांगितले. त्यानंतर आता महिलांना फक्त डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत.

जानेवारीचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana January Installment Date)

जानेवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. मात्र, महापालिका निवडणुकीनंतर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. पुढे परत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी पैसे दिले जाऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये. नवीन आर्थिक वर्षात महिलांना योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाहीये. ३० लाख महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना पैसे मिळणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT