Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी जमा होणार? ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता

Majhi Ladki Bahin Yojana August Month installment Update: लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. महिना संपायला अवघे ६ दिवस उरले आहेत. तरीही अजून कोणतीही घोषणा झालेली नाही.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार?

ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता

पैसे आले की नाही कसं चेक करायचं?

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्यात आता ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीही लाडकीच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

लाडकीचा हप्ता लांबणीवर? (Ladki Bahin Yojana Installment To be Delayed)

ऑगस्ट महिना संपायला अवघे ६ दिवस उरले आहेत. अजूनही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे लाडकीचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कदाचित महिनाअखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. जर महिनाअखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर पुढच्या महिन्यात पैसे दिले जातील.

मागील अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकेक महिला पुढे जात आहे. त्यामुळे या महिन्यातदेखील हप्ता पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही असा करा चेक (Ladki Bahin Yojana Installment Recieve or not)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा केला जाणार, याबाबत स्वतः मंत्री आदिती तटकरे देतात. त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. दरम्यान तुमच्या खात्यात जमा झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल. तसेच तुम्ही बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊनदेखील पैसे जमा झाले की नाही हे चेक करु शकतात. तुम्हाला ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पैसे जमा झाले की नाही हे समजेल. याचसोबत तुम्ही बँकेत जाऊनदेखील पैसे जमा झाले की नाही हे चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Price: नवरात्रीआधी सर्वसामान्यांना गिफ्ट मिळणार,LPG गॅसच्या किंमती कमी होणार?

iPhone 17 साठी कायपण! मुंबईत तुफान राडा, अ‍ॅपल स्टोअरबाहेर एकमेकांना धूधू धुतलं; पाहा VIDEO

Pitru Paksha 2025: श्राद्ध करताना 'या' ५ चुका टाळा नाहीतर होऊ शकतो अनर्थ

Maharashtra Live News Update: माफी मागायचा काय विषय येत नाही, जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर पडळकर ठाम

Ajit Pawar : '...नाहीतर खुर्ची खाली करा' अजित पवारांचा नेमका रोख कुणाकडे? Video

SCROLL FOR NEXT