लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार?
ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले
ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता
ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार
या दिवशी खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लाडक्या बहिणींना ऑगस्ट-सप्टेंबरचे पैसे एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana August-September Month Installment May come Together)
गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यात पैसे दिले जात आहेत. दरम्यान, या महिन्यातदेखील हप्ता पुढे जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे. आणि जर हा हप्ता लांबणीवर गेला तर दोन महिन्याचे पैसे एकत्र येऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या दिवशी खात्यात ३००० रुपये जमा होण्याची शक्यता (Ladki Bahin Yojana 3000 Rupees Come On These Date)
लाडकी बहीण योजनेत महिनाअखेर किंवा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. आता ऑगस्ट महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. तसेच पुढच्या आठवड्यात गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कधीही महिलांना खुशखबर मिळू शकते. महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या काळात दोन हप्ते महिलांना मिळणार का असा प्रश्नदेखील विचारला जात आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.