Mukyamantri Ladki Bahin Yojana Saam Digital
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ; नवीन डेडलाईन कोणती?

Ladki Bahin Yojana Deadline Extended: लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता ३० सप्टेंबरपर्यंत महिला अर्ज करु शकणार आहेत.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पावणेनऊ लाख महिलांनी अर्ज केले आहेत.या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ होती. मात्र, मुदतवाढ करण्यात आली आहे. महिला ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकणार आहेत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांचे अर्ज स्विकारले गेले नाहीत.परंतु या महिलांना आता पुन्हा एकदा अर्ज करता येणार आहे. आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार आहेत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी जुलै महिन्याआधी अर्ज भरला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिना किंवा आता सप्टेंबर महिन्यात अर्ज करणार आहेत त्यांना त्याच महिन्यानंतर पैसे मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांनी ३१ ऑगस्टआधी अर्ज केले नाहीत. त्यांना ३००० रुपये मिळणार आहे. त्यांना सप्टेंबर महिन्यापासून पैसे मिळणार आहेत.

योजनेत अर्ज करुनही पैसे का जमा झाले नाहीत? कारण काय?

ज्या महिलांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाही. त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. तसेच तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे. आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जात काही समस्या असेल तर त्या पुन्हा एकदा अर्ज करु शकणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Mahadik: 'लाडक्या बहि‍णी'बद्दल आधी वादग्रस्त वक्तव्य, आता स्पष्टीकरण, काय म्हणाले धनंजय महाडिक...

NeechBhang Rajyog: 12 महिन्यांनी तयार झाला नीचभंग राजयोग; चंद्र-मंगळ 'या' राशींना करणार मालामाल

Viral Vidoe : नाद करा पण काकांचा कुठे! चक्क डबल-डेकर सायकलवर प्रवास, व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले खूश

Manoj Jarange News : कोणाला पाडायचे, कुणाला निवडून आणायचे? मनोज जरांगे आज फैसला सांगणार!

Viral Video: AC ट्रेनमध्ये ही अवस्था; प्रवासी कोंबले, दरवाजाही लागेना! प्रत्येक प्रवाशाचे दुःख सांगणारा VIDEO

SCROLL FOR NEXT