Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींसाठी ४० हजार रुपयांची कर्ज योजना नाही आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचे जवळपास अडीच कोटी लाभार्थी आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहि‍णींना ४० हजार रुपयांचे कर्ज देणारी योजना सुरु करणार असल्याचे सांगितले आहे.परंतु लाडक्या बहि‍णींसाठी अशी कोणतीही योजना राबवणार नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

आदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती (Aditi Tatkare)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवीन योजना सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये लाडक्या बहि‍णींना ४० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.या ४० हजार रुपयांनी महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करता येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता अशी कोणतीही योजना नाही असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे. लाडक्या बहि‍णींसाठी अशी कोणतीही वेगळी योजना राबवण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.

जुलैचा हप्ता कधी?

लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. जूनचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलैचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये दिला जाईल किंवा सणासुदीचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ

लाडकी बहीण योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. या योजनेत काही महिलांसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या योजनेत निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेत प्राप्तिकर विभागाकडून लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाचा अहवाल मागवला आहे. त्यामध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT