लाडकी बहीण योजनेतून जवळपास ६८ लाख लाभार्थ्यांचा लाभ बंद
लाभ बंद होण्यामागचे नेमकं कारण काय?
केवायसीमुळेही लाखो महिलांचे अर्ज बाद
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली आहे. लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. महिलांचे अर्ज का बाद केले आहेत यामागे अनेक कारणे आहेत. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे निकषात न बसणे आणि केवायसी न करणे. यामुळे महिलांचा लाभ बंद केला आहे.
लाडकी बहीण योजनेतून अपात्र होण्याची कारणे
लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली तेव्हा त्याचे काही निकष निश्चित करण्यात आले होते. या निकषांमध्ये जे महिला बसतात त्यांचेच लाभ सुरु ठेवण्यात आले. सुरुवातीला सरसकट सर्व महिलांना लाभ देण्यात आला होता. त्यानंतर मात्र, महिलांची पडताळणी करण्यात आली. यावेळीच लाखो महिला अपात्र ठरल्या होत्या.लाडकी बहीण योजनेत जुलै २०२५ पर्यंत तब्बल २६.३४ लाख महिलांचा अर्ज बाद केल्याची माहिती समोर आली होती. निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले होते.
अपात्रतेचं नेमकं कारण काय? (Ladki Bahin Yojana Ineligibility Reasons)
कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त असणे
कुटुंबातील कोणाकडे तरी चारचाकी वाहन असणे
महिला शासकीय कर्मचारी असणे
इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर लाभ बंद
२१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच लाभ मिळतो.
केवायसीमुळे लाभ बंद
सुरुवातीला जवळपास २६ लाख महिला अपात्र ठरल्या होत्या.त्यानंतरदेखील लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामागचे कारण म्हणजे केवायसी न करणे. लाखो महिलांनी केवायसी केलेली नाही. यासाठी दोनदा मुदवाढ दिली होती. तरीही महिलांनी केवायसी केलेली नाही. सुरुवातीला या योजनेत २.४७ कोटी लाभार्थी होत्या. आता फक्त १.७ कोटी महिला लाभार्थ्यांना लाभ मिळतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.