Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ६ लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० बंद; आदिती तटकरेंनी कारणच सांगितलं

Ladki Bahin Yojana 6 Lakh Women Installment Stopped: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत ६ लाख लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

सहा लाख लाभार्थ्यांचा लाभ थांबवला

लाभार्थ्यांना पैसे न मिळण्यामागचे कारण

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास उशिर झाला आहे. त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लवकरच नोव्हेंबरचा हप्तादेखील जमा केला जाण्याची शक्यता आहे. त्याआधीच लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून ६ लाख महिलांचा लाभ थांबवला आहे.

६ लाख लाभार्थ्यांचा लाभ बंद

लाडकी बहीण योजनेबाबत काल आदिती तटकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, ६ लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले आहे. लाडकी बहीण योजनेतून एकूण २६ लाख लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्यात आले होते. त्यानंतर आता २० लाख लाभार्थ्यांचे लाभ सुरु करण्यात आला आहे. मात्र, अद्याप सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही. त्यांना फोन करुन तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांना लाभ मिळणार आहे.

लाडकीच्या केवायसीसाठी अंतिम मुदत (Ladki Bahin Yojana KYC Deadline)

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसीसाठी मुदत देण्यात आली आहे. महिलांना १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे महिलांना लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, आता ज्या महिलांचे वडील आणि पती हयात नाही, अशा महिलांनी काय करावे, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanchar Saathi App: संचार साथी अ‍ॅप अनिवार्य नाही, प्री इन्स्टॉलचा केंद्र सरकारचा निर्णय मागे

Health Care : हिवाळ्यात रक्त वाढवण्यासाठी खावेत हे पदार्थ

Sambhajinagar : नामांकित कॉलेजकडून २०० विद्यार्थ्यांची फसवणूक, हॉल तिकीट देण्यास नकार; नेमका काय प्रकार?

Washington Sundar: कोणाला डेट करतोय वॉशिंग्टन सुंदर? जाणून घ्या कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT