Mukhyamantri Ladki Bahin Yojana Saam TV
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वी मिळणार 'बोनस'; या तारखेला जमा होणार ३००० रुपये!

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत तीन हप्ते महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहे. आता लवकरच चौथा आणि पाचव्या महिन्याचे पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये अॅडव्हान्स जमा केले जाणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे १० ऑक्टोबरपर्यंत जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांना आता दिवाळीपूर्वी पैसे मिळणार आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आतापर्यंत तीन महिन्याचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहे.आतापर्यंत २ कोटी महिलांच्या अकाउंटला तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत. आता पुढच्या महिन्याचा हप्ता सधी येणार याबाबत प्रश्न महिलांना पडला आहे.

१० ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं अजित पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान ८ ऑक्टोबरपासूनच लाडकी बहीण योजनेत पैसे जमा होण्यास सुरुवात केली आहे. १० ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३००० रुपये जमा केले जाणार आहेत. (Ladki Bahin Yojana 4th Installment)

या योजनेत ज्या महिलांचे अर्ज जुलै महिन्यात मंजुर झाले आहेत. त्यांच्या अकाउंटला एकही रुपया आलेला नाही. त्या महिलांना जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे ७५०० रुपये मिळणार आहे. तसेच ज्या महिलांना सप्टेंबरपर्यंत हप्त्याची रक्कम मिळाली होती. त्यांना ३००० रुपये मिळणार आहेत. (Ladki Bahin Yojana 4th and 5th Installment)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SL W : भारताच्या लेकींनी श्रीलंकेला चारली धूळ; टॉप-२ मध्ये हरमनसेनेची एन्ट्री

Ajit Pawar : 'दादा बारामतीतून तुम्हीच लढा'; अजित पवारांना कार्यकर्त्यांचा आग्रह, नेमकं काय राजकारण शिजतंय? वाचा

Pankaja Munde : दसरा मेळाव्यात राजकीय संघर्षाबाबत पंकजा मुंडे काय बोलणार?

IND vs BAN, 2nd T2OI: टीम इंडियाच्या विजयाची सप्तमी! बांगलादेशला नमवत मालिकेत घेतली २-० ची विजयी आघाडी

News Policy For School Teachers : गाढव, घुबड आणि उंट...! विद्यार्थ्यांना टोमणे देणे होणार बंद, शिक्षकांच्या संतापावर मर्यादा

SCROLL FOR NEXT