Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: ४५ लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद; २६ लाख महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार

Ladki Bahin Yojana 45 Lakh Women Benefit Stopped: लाडकी बहीण योजनेतून ४५ लाख महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. तर २६ लाख महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेतून ४५ लाख महिलांचे अर्ज बाद

२६ लाख महिलांची पुन्हा पडताळणी होणार

लाखो महिलांवर अपात्रतेची टांगती तलवार

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतून आता ४५ लाख महिलांना बाद करण्यात आले आहेत. तर २६ लाख महिलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केल्याने महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे.

४५ लाख महिला बाद

लाडकी बहीण योजनेतून ४५ लाख महिलांना बाद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामागे अनेक कारणे आहेत. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. दरम्यान, केवायसी न केल्याने लाखो महिलांचे लाभ बंद झाले आहेत. केवायसी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. तोपर्यंत ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचे लाभ बंद झाले आहेत. याचसोबत ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचा लाभ बंद झालेला नाही. यामध्ये सरकारी कर्मचारी, पुरुष लाभार्थी, वयोमर्यादेत न बसणाऱ्या महिलांचाही लाभ बंद केला आहे. याचसोबत ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे.

केवायसीनंतर २६ लाख महिलांना पैसे नाहीत

लाडकी बहीण योजनेत २६ लाख महिलांची पुन्हा पडताळणी होणार आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करुनही महिलांचा लाभ बंद झाला आहे. केवायसीमध्ये चुकीच्या प्रश्नांची उत्तरे दिल्याने त्यांचा लाभ बंद झाला आहे. त्यामुळे आता त्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. महिलांच्या घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये सर्व निकषात बसणाऱ्या महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक भाषा टिकवण्यासाठी परराज्यांचे धोरण काय?,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

Ladki Bahin Yojana: रखडलेल्या हप्त्यासाठी महिलांचा राडा; लाडकींचे पैसे नेमके गेले कुठे?

एका सेल्फीवर EPF चं खातं उघडता येणार; जाणून घ्या प्रोसेस स्टेप बाय स्टेप

Russia vs Ukraine war : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा पेटलं; युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त, VIDEO

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

SCROLL FOR NEXT