महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही महिलांमध्ये लोकप्रिय झाली आहे. महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २९ सप्टेंबरपासून हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत तिसऱ्या हप्त्याच्या सुरुवातीला ५१२ कोटी रुपये जमा झाले आहेत.
महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबत माहिती दिली आहे.आतापर्यंत ३४,७४,११६ महिलांना पैसे मिळाले आहेत.
या योजनेत ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांना ४५०० रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरलेत त्यांना १५०० रुपये मिळणार आहे. ज्या महिलांना तांत्रिक अडचणींमुळे योजनेचा लाभ मिळाला नव्हता, त्यांना या योजनेत लाभ मिळणार आहे.
ज्या महिलांच्या फॉर्ममध्ये काही चुका असतील. त्यांना अजूनही या योजनेत पैसे मिळाले नाहीत. तसेच त्या महिलांचे बँक खाते आणि आधार कार्ड नंबर लिंक नसेल त्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाही. परंतु या महिलांना बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले आहेत. तसेच ज्या महिलांचे अर्ज अजूनपर्यंत स्विकारले नाहीत, त्यांना पैसे मिळणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊन तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पैसे आलेत की नाही ते चेक करु शकतात. त्याचसोबत पोस्टात अकाउंट असेल तर ऑफलाइन पद्धतीने जाऊन पैसे आलेत की नाही ते पाहू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.