Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातून २४ हजार महिलांचे अर्ज बाद झाले असल्याची माहिती समोर आले आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

योजनेतून २४ हजार महिलांचे अर्ज बाद

निकषात न बसलेल्या महिलांचे अर्ज बाद

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आहे. जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत ठाणे जिल्ह्यातून १४ लाख ६५ हजार ८७६ अर्ज दाखल झाले होते. त्यातील अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातून इतक्या महिला अपात्र

ठाणे जिल्ह्यातून जवळपास १४,६५,८७६ महिलांनी अर्ज केले होते. त्यातील १४ लाख ४१ हजार ७९८ अर्ज स्विकारले गेले होती. यामधील २४ हजार ७८ अर्ज बाद करण्यात आले आहे. ठाणे प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील २४ हजार महिला अपात्र ठरल्या त्यांना आता इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान,ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची ईकेवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहेत.

लाडकी बहीण योजना केवायसीची अंतिम तारीख (Ladki Bahin Yojana KYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना केवायसी अनिवार्य केले आहे. योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटचे ४ दिवस उरले आहेत. तुम्हाला १८ नोव्हेंबरपर्यंत केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावेत.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत किती लाभार्थी? (Ladki Bahin Yojana Women List)

लाडकी बहीण योजना मागच्या वर्षी जून महिन्यात सुरु झाली होती. या योजनेत ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत होती. या योजनेत ऑक्टोबर २०२४ पर्यंत २.५६ कोटी महिलांने अर्ज केले होते. त्यातील महिलांची पडताळणी करण्यात आली. यातील लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

IAS Promotion : 67 IAS अधिकाऱ्यांचं प्रमोशन, आता लवकरच होणार बदली, कोणाला मिळालं कोणतं पद?

नागपूर अधिवेशनातून मुंबईकरांना गिफ्ट, 20 हजार अनधिकृत इमारतींना 'अभय'

विधीमंडळातले राडेबाज, थेट कारावास, आव्हाड- पडळकर समर्थक अडचणीत|VIDEO

SCROLL FOR NEXT