Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा झाले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Ladki Bahin Yojana Installment Deposit Or Not: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही अशा पद्धतीने करा चेक.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता जुलैचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. जूनचा हप्ता हळूहळू सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होत आहे. लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा झाले की नाही हे ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा झाले की नाही असं करा चेक (Ladki Bahin Yojana 1500 Rupees Installment Deposit or Not Check Online Process)

लाडकी बहीण योजनेत खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. तुम्ही बँकेच्या अॅपवर जाऊन चेक करु शकतात. बँकेच्या अॅपमध्ये तुम्ही तुमचा बॅलेन्स चेक करु शकतात. त्यात तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही ते समजेल. तसेच ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन कोणी पैसे पाठवले हेदेखील पाहू शकतात. त्यावरुन तुम्हाला १५०० रुपये जमा झाले की नाही हे समजेल.

तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेदेखील पैसे जमा झाले की नाही चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करावी लागेल. त्यावरुन तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे तुम्हाला समजेल. हे पैसे कोणी डिपॉझिट केले याचीदेखील माहिती मिळेल.

जुलैचा हप्ता कधी मिळणार? (When Will Ladki Bahin Yojana July Month Installment Recieved)

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता जमा झाला आहे. आता जुलैचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. लवकरच जुलैचा हप्तादेखील जमा केला जाईल. जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात किंवा एखाद्या सणासुदीच्या मूहूर्तावर पैसे दिले जातील. हे पैसे कधी देणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT