Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: जिल्हा परिषदेच्या ११८१ महिलांनी घेतला 'लाडकी'चा लाभ; आता कारवाई होणार; सरकारने काढले आदेश

Majhi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा आता जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. आता या महिलांवर कारवाई केली जाणार आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता ज्या सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे.त्यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. यामुळे आता या लाडक्या बहि‍णींना योजनेतून तर अपात्र केले जाणार आहे त्याचसोबत कार्यवाहीदेखील केली आहे.

११८१ जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घेतला योजनेचा लाभ (1181 Zilla Parishad Employees Get Benefit of Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेचा ११८१ जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असलेल्या महिलांनी लाभ घेतला आहे. आता या महिलांवर कारवाई करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. यासाठी त्यांनी परिपत्रक जारी केलं आहेत.

माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या डेटाच्या आधारे जिल्हा परिषदेतील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यादी महिला व बाल विकास विभागाने पाठवली आहे. सदर योजनेच्या अटीनुसार, सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शतत नाही.त्यामुळे संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाअंतर्गत कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याबाबत कळवले आहे.

ज्या जिल्हाधिकरी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्या कारवाईबाबत अहवाल महिला व बालविकास विभागाला उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना जारी केल्या आहेत.

सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींवर काय कारवाई होणार?

आता या लाडकी बहीण योजनेतून सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. याचसोबत त्यांच्यावर सरकारकडून कारवाई केली जाणार आहे. आता या महिलांवर नक्की काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या लाडक्या बहिणींचे निलंबन केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचसोबत या महिलांचे वेतनदेखील थांबवले जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT