Ladki Bahin Yojana : बोगस लाडकींचा सरकारला 162 कोटींचा चुना, 90 हजार अपात्र लाभार्थ्यांकडून वर्षभर लाभ

Ladki Bahin Yojana News : लाडकी बहिण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या बोगस लाभार्थ्यांकडून वसुली केली जाणार का?
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanax
Published On

Ladki Bahin Yojana Updates : वर्षपूर्ती झालेल्या लाडकी बहिण योजनेतल्या भ्रष्टाचाराच्या एकेक सूरस कथा आता बाहेर येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोरपणे छाननी सुरु झाली आणि त्यातून समोर आलेली अपात्र बहिणींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच आता माहिती अधिकारातून समोर आलेली माहिती अधिकच धक्कादायक आहे. राज्यातील तब्बल दीडशे कोटींपेक्षा जास्त बोगस लाडकींनी सरकारी पैशांवर डल्ला मारला आहे.

12 हजार 431 पुरुष अपात्र

77 हजार 980 महिला अपात्र

एकूण 90 हजार 411 लाभार्थी अपात्र

यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी मात्र मिळालेल्या डेटावरुन क्रॉस व्हिरेफीकेशन सुरु असल्याचं म्हटलंय.

Ladki Bahin Yojana
Maharashtra Politics : ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

गेल्या वर्षभरापासून अपात्र लाभार्थी योजनेचा लाभ घेत होते. आणि याची कुठलीच माहिती सरकारी यंत्रणांना नव्हती... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणा-या या अपात्र लाभार्थ्यांकडून सगळे पैसे वसूल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जातेय..मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार खरोखरच कठोर पावलं उचलणार का आणि विधानसभेत पोचण्यासाठी मदत करणाऱ्या लाडक्या बहिणींना दुखावण्याची हिमत दाखवणार का हा प्रश्नच आहे..

Ladki Bahin Yojana
Accident : तिचा हात १०-१२ फुटांवर पडला, सरकत-सरकत...; अभिनेत्रीच्या अपघाताची घटना मन सुन्न करणारी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com