Nirmala Sitharaman Google
बिझनेस

Budget 2024: मोदी 3.0 सरकारचं पहिलं अर्थसंकल्प कधी होणार सादर? समोर आली मोठी अपडेट

Central Government Budget 2024: केंद्रातील मोदी 3.0 सरकारचं पहिलं अर्थसंकल्प कधी होणार सादर, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

केंद्रातील नवीन मोदी 3.0 सरकारचं पहिलं अर्थसंकल्प कधी होणार सादर, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करू शकतात. सीतारामन या 20 जून रोजी इंडस्ट्री चेंबर्ससोबत प्री-बजेट चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितले की, अर्थसंकल्पावर सल्लामसलत करण्याआधी सीतारामन यांची 18 जून रोजी महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांच्यासोबत बैठक होणार आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी आर्थिक अजेंडा निश्चित केला जाईल.

नवीन अर्थसंकल्पात नजीकच्या भविष्यात भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रूपरेषा ठरवली जाऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अंदाजानुसार, ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा आणि महागाई कमी झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.

भारतीय उद्योग परिसंघाचे (CII) नवे अध्यक्ष संजीव पुरी यांनी सर्वात कमी स्लॅबमधील लोकांसाठी आयकर सवलतीचा विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जमीन, वीज आणि शेतीशी संबंधित सर्व सुधारणांचा यशस्वीपणे पाठपुरावा करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये सहमती निर्माण करण्यासाठी एक संस्थात्मक व्यासपीठ तयार करण्याची सूचनाही पुरी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात कर्जत- बदलापूर लोकल वाहतूक सुरू होणार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून आणखी ६१,१४६ महिलांचे अर्ज बाद, तुमचं नाव नाही ना?

Manikrao Kokate : रोहित पवारांनी आणखी एक पत्ता काढला, कृषीमंत्र्यांवर केला गंभीर आरोप

Igatpuri Tourism : पावसाच्या सरी अन् धुक्याची चादर, इगतपुरीजवळ वसलाय निसर्गाचा अद्भुत नजारा

Ladki Bahin Yojana : लाडकीमुळे महाराष्ट्रातील ४ योजना बंद; लाभार्थी शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT