KIA INDIA EXTENDS WARRANTY TO 7 YEARS FOR SELTOS, SONET, AND CARENS 
बिझनेस

Kia Car Warranty: किआ इंडिया कारची भन्नाट वॉरंटी, आता तुमची कार राहणार जास्त काळ सुरक्षित

Kia Car Extended Warranty: किआ इंडियाने आपल्या कारच्या वॉरंटी कालावधीत वाढ करून तो आता ७ वर्षांपर्यंत केला आहे. कंपनीने ही योजना ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी आणली आहे.

Dhanshri Shintre

  • किआ इंडियाने आपल्या कारची वॉरंटी ५ वर्षांवरून वाढवून ७ वर्षांची केली.

  • ही सुविधा सेल्टोस, सोनेट, सिरॉस आणि कॅरेन्स कारसाठी लागू आहे.

  • नवीन ग्राहकांना ₹४७,२४९ पासून आणि जुन्या ग्राहकांना ₹३२,१७० मध्ये अपग्रेडची संधी.

  • कंपनीचा उद्देश ग्राहकांना दीर्घकालीन विश्वास, मनःशांती आणि उत्तम सेवा देणे हा आहे.

भारतीय वाहन बाजारात किआ इंडिया कारने आपल्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या कारच्या वॉरंटी कालावधीत मोठी वाढ केली आहे. यापूर्वी ५ वर्षांची वॉरंटी असलेल्या किआ कारला आता ७ वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. ही सुविधा कंपनीच्या सेल्टोस, सोनेट, सिरॉस आणि कॅरेन्स या लोकप्रिय मॉडेल्ससाठी लागू करण्यात आली आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवीन ग्राहकांनी किआ कार खरेदी केल्यास ४७,२४९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या दरात ७ वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. तर सध्याच्या ग्राहकांना त्यांच्या वाहनांच्या वॉरंटीमध्ये ३२,१७० रुपये देऊन अपग्रेड करता येणार आहे.

किआ इंडिया कारचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद यांनी सांगितले की ग्राहकांना परिपूर्ण मन:शांती आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा आमचा उद्देश असून, टिकाऊपणेवर आत्‍मविश्वास निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. दीर्घकालीन सेवा आणि उत्तम वापराचा अनुभव मिळावा म्हणून कंपनीने ही नवी योजना आणली आहे. अधिकृत किआ डीलरशिपवर ही सेवा देशभरात उपलब्ध असून, ग्राहकांना देखभाल खर्चातही राहत मिळणार आहे. त्यामुळे पुढील ७ वर्षे, किआ वाहनधारकांना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक त्रासासाठी कंपनीच्या सर्व्हिस नेटवर्कवर विश्वास ठेवता येणार आहे.

या निर्णयामुळे किआ वाहनांच्या विक्रीत किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास अधिक मजबूत होईल. भारतातील वाहन बाजारात किआ इंडियाने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, अभिनव सेवा व विविध ऑफर्समुळे कंपनीचा ब्रँड दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. सात वर्षांची वॉरंटी योजना ही केवळ सेवा नव्हे, तर किआ इंडियाच्या ग्राहकांशी असलेल्या ओळखीचा ठोस पुरावा म्हणून पाहिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT