Kia Syros Car Saam tv
बिझनेस

Kia Syros Car Launch : किया सिरॉस भारतात लाँच; एसयूव्हीमध्ये दमदार फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि बरंच काही

Kia Carens Turbo Petrol and Diesel Engine Details : किया सिरॉस भारतात लाँच झाली आहे. एसयूव्हीमध्ये दमदार फीचर्स आहेत. या कारची किंमत आणि बरंच काही जाणून घ्या.

Vishal Gangurde

किया इंडिया या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ८.९९ लाख रूपयांपासून सुरू होणाऱ्या नवीन किया सिरॉस लाँच केली आहे. या कारच्या मध्‍यम आणि कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणींमध्‍ये नवीन एसयूव्‍ही सेगमेंट दाखल केला आहे. कंपनीचे प्रीमियम मॉडेल्‍स ईव्‍ही९ व कार्निवलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेतली आहे. या सिरॉसमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा आणि आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण आहे.

किया इंडियाचे चीफ सेल्‍स ऑफिसर जून्‍सू चो म्‍हणाले, टभारतात, विशेषत: वेईकल्‍सकडून अधिक अपेक्षा करणारे तरूण, तंत्रज्ञानप्रेमी व साहसी ड्रायव्‍हर्समध्‍ये एसयूव्‍हीची मागणी वाढत आहे. किया इंडिया नाविन्‍यता आणि ग्राहक-केंद्रित डिझाइनच्‍या माध्‍यमातून ऑटोमोटिव्‍ह उद्योगामध्‍ये शक्‍य असलेल्‍या मर्यादांना दूर करत आहे.

किया सिरॉस पोर्टफोलिओमधील एसयूव्‍हीच्‍या नवीन प्रजातीला सादर करते. या कारमध्ये प्रगत तंत्रज्ञान, अपवादात्‍मक आरामदायीपणा आणि आकर्षक डिझाइनचे संयोजन आहे. कारच्या इंटीरिअर्समध्‍ये शाश्‍वत साहित्‍याचा वापर करण्‍यात आला आहे'.

किया सिरॉसमध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट ओव्‍हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्‍टम आहे. जी ऑटोमॅटिकली १६ कंट्रोलर्सचे अपडेट करते. तसेच यासाठी डिलरशिपला भेट देण्‍याची गरज नाही. किया कनेक्‍ट २.० सिस्‍टममध्‍ये ८० हून अधिक वैशिष्‍ट्यांची श्रेणी आहे. कारने किया कनेक्‍ट डायग्‍नोसिस (केसीडी) सादर केलं आहे. यामुळे दूरूनच त्‍यांच्‍या वेईकलच्‍या स्थितीचे मूल्‍यांकन करण्‍याची सुविधा देते. तसेच अडवान्‍स्‍ड टोटल केअर (केएटीसी) सक्रियपणे ग्राहकांना टायर रिप्‍लेसमेंट्स आणि मेन्‍टेनन्‍स अशा आवश्‍यक सर्विसेसबाबत माहिती देते, यामुळे मालकीहक्‍काची खात्री मिळते.

कियामध्ये २,५५० मिमी व्‍हीलबेस दिली आहे. तसेच ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल कनेक्‍टेड कार नेव्हिगेशन कॉकपीटप्रमाणे सेवा देते. यातून डिजिटल इंटरफेस मिळतं.

आरामदायी वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:

समर्पित ५-इंच क्‍लायमेट कंट्रोल डिस्‍प्‍ले जलदपणे आणि सहजपणे क्‍लायमेट सेटिंग्‍ज देते.

वायरलेस अॅप्‍पल कारपले आणि अँड्रॉईड ऑटो यात आहे. तसेच ऑडिओ अनुभवासाठी हार्मन कार्डन प्रीमियम ८-स्‍पीकर साऊंड सिस्टम देण्यात आले आहेत.

रिअर सीट व्‍हेंटिलेशन देखील आहे.

स्‍लायडिंग आणि रिक्‍लायनिंग ६०:४० स्प्लिट रिअर सीट्समध्ये स्थिर बूट स्‍पेस आहे.

कारमध्ये ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ आहे. यामुळे केबिनमध्‍ये हवा खेळती राहण्‍याचा अनुभव देते.

सुरक्षितता आणि कार्यक्षमता काय आहे?

किया सिरॉसमध्‍ये लेव्‍हल २ अॅडवान्स ड्रायव्‍हर असिस्‍टन्स सिस्‍टम्‍स (एडीएएस) असून यात १६ ऑटोनॉमस सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आणि सर्वसमावेशक २० रॉबस्‍ट सेफ्टी पॅकेज आहे.

स्‍मार्ट क्रूझ कंट्रोलसह स्‍टॉप अँड गो देखील आहे.

फ्रन्ट कोलिजन वॉर्निंगसह अव्‍हॉयडन्स असिस्‍ट देखील आहे.

लेन किप असिस्‍ट आणि लेन फॉलो असिस्‍ट देखील आहे.

३६०-डिग्री कॅमेरासह ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर देखील आहे.

इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रेाल आणि हिल स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल आहे.

कारमधील प्रवाशांच्या संरक्षणासाठी सहा एअरबॅग्‍ज आहेत. एबीएस देखील आहे.

इंजिन आणि व्‍हेरिएन्ट्स

कारमध्ये स्‍मार्टस्‍ट्रीम १.०-लिटर टूर्बो पेट्रोल इंजिन आहे. (८८.३ केडब्‍ल्‍यू/१२० पीएस, १७२ एनएम)

कारमध्ये १.५-लिटर सीआरडीआय डिझेल इंजिन आहे. (८५ केडब्‍ल्‍यू/११६ पीएस, २५० एनएम)

दोन्‍ही इंजिन्‍स मॅन्‍युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन पर्यायांसोबत कियाचे ६एमटी कन्फिग्‍युरेशन असलेल्‍या पहिल्‍याच स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.० टर्बो जीडीआयसह ऑफर करण्‍यात आले आहेत.

सिरॉस ही कार एचटीके, एचटीकेक+, एचटीएक्‍स, एचटीएक्‍स+ या चार ट्रिम्‍समध्‍ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही कार ग्‍लेशियर व्‍हाइट पर्ल, स्‍पार्कलिंग सिल्‍व्‍हर, प्‍यूटर ऑलिव्‍ह, इंटेन्‍स रेड, फ्रॉस्‍ट ब्‍ल्‍यू, अरोरा ब्‍लॅक पर्ल, इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू आणि ग्रॅव्हिटी ग्रे या आठ रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT