बिझनेस

Castrol India: कॅस्‍ट्रॉल इंडियाकडून केदार लेले यांची व्‍यवस्‍थापकीय संचालक म्‍हणून नियुक्‍ती

Castrol India: कॅस्‍ट्रॉल ल्‍युब्रिकण्‍ट्स उद्योगामधील मोठ्या प्रमाणात प्रशंसित ब्रँड आहे. कॅस्ट्रॉल इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकापदी केदार लेले यांची नियुक्ती करण्यात आलीय.

Bharat Jadhav

कॅस्‍ट्रॉल इंडिया लिमिटेड या आघाडीच्‍या ल्‍युब्रिकण्‍ट उत्पादक कंपनीच्या व्‍यवस्‍थापकीय संचालकपदी केदार लेले यांची नियुक्ती करण्यात आलीय. ते १ नोव्‍हेंबर २०२४ पासून आपला पदभार संभाळतील. हिंदुस्‍तान युनिलिव्‍हर लिमिटेड (एचयूएल)मध्‍ये दोन दशकांच्‍या उत्तम कारकिर्दीनंतर केदार कॅस्‍ट्रॉल इंडियामध्‍ये सामील झाले. केदार लेले यांनी एचयूएलमध्‍ये कंपनीचे कार्यकारी संचालक म्‍हणून धुरा सांभाळलीय.

दक्षिण आशियामधील सेल्‍स अँड कस्‍टमर डेव्‍हलपमेंट करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. उच्‍च-कार्यक्षम टीमचे नेतृत्‍व, विकास आणि नाविन्‍यतेला चालना देण्‍यामध्‍ये सखोल कौशल्‍य असलेले केदार विकसित होत असलेल्या ऑटोमोटिव्‍ह व ल्‍युब्रिकण्‍ट्स उद्योगामध्‍ये कॅस्‍ट्रॉल इंडियाच्‍या भविष्‍याला आकार देण्‍यास महत्त्वपूर्ण भूमिका साकारतील अशी आशा आहे. या नियुक्‍तीबाबत मत व्‍यक्‍त करत कॅस्‍ट्रॉल इंडिया लिमिटेडचे अध्‍यक्ष राकेश मखिजा म्‍हणाले, "आम्‍हाला कॅस्‍ट्रॉल इंडियामध्‍ये केदार यांचे स्‍वागत करताना आनंद होत आहे.

विकासाला चालना देण्‍यासह बाजारपेठांमध्ये मोठ्या टीम्‍सचे नेतृत्‍व करण्‍यामध्ये त्‍यांचा मोठा अनुभव त्‍यांना कॅस्‍ट्रॉल इंडियाचे नेतृत्‍व करण्‍यास ते योग्य आहेत. मी संदीप यांचे गेल्‍या काही वर्षांमधील त्‍यांच्‍या अपवादात्‍मक नेतृत्‍वासाठी आभार व्‍यक्‍त करतो. बाजारपेठेत आमचे स्‍थान प्रबळ करण्‍यामध्‍ये त्‍यांचे योगदान मोलाचे राहिले आहे आणि आम्‍ही त्‍यांना त्‍यांच्‍या नवीन जागतिक भूमिकेमध्‍ये यशासाठी शुभेच्‍छा देतो.''

यानंतर केदार लेले म्‍हणाले,“कॅस्‍ट्रॉल ल्‍युब्रिकण्‍ट्स उद्योगामधील मोठ्या प्रमाणात प्रशंसित ब्रँड आहे. मला विकास व परिवर्तनाच्‍या पुढील टप्‍प्‍यामध्‍ये कॅस्‍ट्रॉल इंडियाचे नेतृत्‍व करण्‍याचा आनंद होतोय. मी आमच्‍या पोर्टफोलिओला विस्‍तारित करत राहण्‍यासोबत व्‍यवसाय विकासाला चालना देण्‍यासाठी मॉडेल्‍सच्‍या प्रभावी उपयोजनाला प्रमुख प्राधान्‍य देईन.

आम्‍ही भारतातील गतीशीलता क्षेत्रात अग्रस्‍थानी राहण्‍यासाठी आमचा विश्‍वसनीय ब्रँड, नाविन्‍यपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओ आणि अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत राहू. विविध श्रेणींसह भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये काम करण्‍याच्‍या अनुभवाने मला यशस्‍वी टीम्‍स निर्माण करण्‍यासाठी, तसेच त्‍यांच्‍यामध्‍ये उत्‍साहपूर्ण इनोव्‍हेशन आणि सर्वोत्तम अंमलबजावणीची शिस्‍तबद्धता बिंबवण्‍यासाठी उत्तमरित्‍या सुसज्ज केले आहे, जे कॅस्‍ट्रॉलच्‍या महत्त्वाकांक्षी विकास योजनांशी संलग्‍न आहे.''

विनासायास नेतृत्‍वाच्‍या खात्रीसाठी केदार १ सप्‍टेंबर २०२४ पासून निवर्तमान व्‍यवस्‍थापकीय संचालक संदीप सांगवान यांच्‍यासोबत बारकाईने काम करत आहेत. नेतृत्‍वामध्‍ये बदल झाल्‍यानंतर संदीप १ नोव्‍हेंबर २०२४ पासून लंडनमधील कॅस्‍ट्रॉलच्‍या मुख्‍यालयामध्‍ये ग्‍लोबल चीफ मार्केटिंग ऑफिसर म्‍हणून धुरा सांभाळणार आहेत.

भारतात केदार कॅस्‍ट्रॉल भारतीय उपखंडामधील यशस्‍वी कामगिरी सुरू ठेवण्‍यासाठी सुसज्‍ज आहेत. कंपनी आपले बाजारपेठ नेतृत्‍व कायम ठेवण्‍याप्रती, नाविन्‍यतेमधील मर्यादांना दूर करण्‍याप्रती आणि भागधारकांसाठी लाभदायी वातावरणाला चालना देण्‍याप्रती कटिबद्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

Maharashtra Live News Update : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT