Kanya Sumangala Yojana Saam Tv
बिझनेस

Kanya Sumangala Yojana: मुलींच्या शिक्षणासाठी सरकार करणार आर्थिक मदत; मिळणार ७५००० रुपये; कन्या सुमंगला योजना आहे तरी काय?

Kanya Sumangala Yojana For Giris: उत्तर प्रदेश सरकारने मुलींसाठी खास कन्या सुमंगला योजना राबवली आहे. या योजनेत मुलींना जन्मापासून ते शिक्षणासाठी ७५००० रुपये दिले जातात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना उत्तम शिक्षण मिळावे. त्यांचे भविष्य उज्जवल व्हावे, यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाते. केंद्रासोबत अनेक राज्य सरकारनेही मुलींसाठी योजना राबवल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने मुलींसाठी खास कन्या सुमंगला योजना राबवली आहे. कन्या सुमंगला योजनेअंतर्गत मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक मदत केली जाते.

कन्या सुमंगला योजनेत सरकार मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सर्व खर्च करते. कन्या सुमंगला योजनेत मुलींना ७५००० रुपये दिले जातात. मुलींच्या जन्मानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हे पैसे दिले जातात.

२०१९ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. सुरुवातीला मुलींच्या आईवडिलांना हे पैसे दिले जातात. मुलींच्या नावावर हे पैसे जमा केले जातात. मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक इयत्तेमध्ये ठरावीक रक्कम दिली जाते. या योजनेत मुलगी १ वर्षाची झाल्यावर तिला २००० रुपये दिले जातात.

तुमची मुली पहिलीत गेल्यावर तिला ३००० रुपये दातात. त्यानंतर सहावी आणि नववीत गेल्यावर प्रत्येकी ३००० रुपये दिले जातात. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे. त्यांना शाळेची फी भरता यावी, यासाठी ही मदत केली जाते.

तुमच्या मुलीचे १०वी, बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर तिने डिग्री किंवा डिप्लोमासाठी अॅडमिशन घेतले तर तिला ७००० रुपये दिले जातात. त्यानंतर उरलेले पैसे दिले जातात. या योजनेसाठी अर्ज करताना मुलीचे फोटो, नववीचे प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे सादर करावे लागणार आहे. यानंतर संबंधित विद्यापीठाचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

Mumbai Metro: घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांचे प्रचंड हाल; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT