बिझनेस

Jio VS Airtel: ३५९९ रुपयांचा प्लॅनमध्ये कोण देतं जास्त डेटा आणि फायदे, जाणून घ्या बेस्ट प्लॅन कोणता?

Best Recharge Plan: जिओ आणि एअरटेलच्या ३५९९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये मोठी स्पर्धा आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळतात. कोणता प्लॅन फायदेशीर जाणून घ्या.

Dhanshri Shintre

एअरटेल आणि जिओ

एअरटेल आणि जिओ हे दोन्ही टेलिकॉम कंपन्या ३५९९ रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक फायदे उपलब्ध आहेत.

जिओच्या प्लॅनचे फायदे काय?

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा, प्रतिदिन १०० एसएमएस आणि देशभरात अमर्यादित कॉलिंगची सुविधा उपलब्ध होते.

३६५ दिवसांची वैधता

जिओचा हा प्रीपेड प्लॅन पूर्ण ३६५ दिवसांची वैधता देतो. म्हणजेच यूजर्सना वर्षभराचा रिचार्जचा फायदा मिळतो.

ओटीटी फायदे कोणते?

या प्लॅनमध्ये यूजर्सना ९० दिवसांसाठी जिओ हॉटस्टारची सबस्क्रिप्शन आणि अतिरिक्त ५० जीबी क्लाउड स्टोरेजची सुविधा दिली जाते.

एअरटेलच्या प्लॅनचे फायदे?

३५९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये रोज २ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि देशभरात अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते.

या प्लॅनचे फायदे

एअरटेलचा ३५९९ रुपयांचा प्लॅनही जिओप्रमाणेच संपूर्ण ३६५ दिवसांची वैधता उपलब्ध करून देतो. म्हणजेच वार्षिक रिचार्जचा फायदा मिळतो.

दोन प्लॅन्समध्ये डेटाचा फरक

या दोन प्लॅन्समध्ये डेटाचा फरक स्पष्ट आहे. जिओ यूजर्सना दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. तर एअरटेल आपल्या ग्राहकांना प्रतिदिन २ जीबी डेटा देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT