बिझनेस

JioSaavn Pro: जिओची जबरदस्त ऑफर! फक्त ९ रुपयांत JioSaavn Pro सबस्क्रिप्शन, जाहिरातीशिवाय हाय-क्वालिटी ऑडिओपर्यंत सर्व सुविधा फ्री

Jio Music Offer: जिओने सणासुदीच्या हंगामात खास ऑफर आणली आहे. केवळ ९ रुपयांत ६० दिवस JioSaavn Pro वापरून यूजर्स जाहिरातीशिवाय गाणी, ऑफलाइन डाउनलोड आणि उच्च-गुणवत्तेचा ऑडिओ एन्जॉय करू शकतात.

Dhanshri Shintre

  • जिओने फक्त ९ रुपयांत ६० दिवसांसाठी JioSaavn Pro सबस्क्रिप्शन जाहीर केले.

  • या ऑफरमध्ये जाहिरातमुक्त संगीत, ऑफलाइन डाउनलोड आणि प्रीमियम ऑडिओ मिळणार आहे.

  • नेहमीप्रमाणे ९९ रुपयांत मिळणारा प्लॅन आता मर्यादित कालावधीसाठी सवलतीत.

  • सणासुदीच्या काळात संगीतप्रेमींसाठी जिओची ही खास भेट ठरणार आहे.

जिओने आपल्या यूजर्ससाठी खास भेट आणली आहे. संगीतप्रेमींसाठी ही बातमी अत्यंत आनंददायी ठरणार आहे. कारण आता फक्त 9 रुपयांत तुम्ही संपूर्ण 60 दिवस JioSaavn Pro चे सबस्क्रिप्शन घेऊ शकणार आहात. यामुळे दोन महिन्यांसाठी जाहिरातमुक्त(Advertisement) संगीताचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.

सणासुदीच्या काळात जिओने ही विशेष ऑफर जाहीर केली असून, तिच्यामध्ये यूजरेसना ऑफलाइन डाउनलोड, उच्च-गुणवत्तेचा ऑडिओ आणि क्युरेटेड प्लेलिस्टचे फायदे मिळणार आहेत. नेहमीप्रमाणे JioSaavn Pro ची किंमत प्रति महिना 99 रुपये असते, मात्र आता मर्यादित कालावधीसाठी कंपनी ही सेवा केवळ 9 रुपयांत उपलब्ध करून देत आहे.

अशा प्रकारे तुम्ही JioSaavn Pro सक्रिय करू शकता

1. ही ऑफर मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये MyJio अॅप इंस्टॉल करून त्यावरून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

2. सर्वप्रथम जिओ क्रमांकाने लॉगिन करा आणि आलेला ओटीपी टाकून तुमचे अकाउंट सहजरीत्या लॉगिन करा.

3. लॉगिन झाल्यानंतर JioEngage किंवा Jio Offers विभागात जा. येथे तुम्हाला JioSaavn Pro चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर दिसेल.

4. ऑफर मिळवण्यासाठी ‘Claim Now’ किंवा ‘Activate Offer’ बटण दाबा. त्यानंतर तुमचा जिओ नंबर JioSaavn Pro साठी सक्रिय होईल.

5. तुमच्या मोबाईलमध्ये JioSaavn अॅप डाउनलोड करा आणि MyJio अॅपवरून अ‍ॅक्टिव्हेट केलेल्या त्याच जिओ नंबरने लॉगिन करून प्रो फीचर्सचा अनुभव घ्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, म्युझिक आणि पॉडकास्ट स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने मंगळवारी अधिकृत घोषणा केली की हा प्लॅन लवकरच सुरू होणार आहे. या ऑफरअंतर्गत यूजर्सना पहिल्या दोन महिन्यांसाठी JioSaavn Pro चे सर्व फायदे कमी किमतीत मिळतील. त्यामुळे गाणी ऐकताना वारंवार येणाऱ्या जाहिरातींना पूर्णविराम देत, तुम्ही अखंड आणि उच्च दर्जाचा गाण्यांचा अनुभव घेऊ शकता.

JioSaavn Pro ची नवीन ऑफर काय आहे?

फक्त ९ रुपयांत तुम्ही ६० दिवस JioSaavn Pro चे सबस्क्रिप्शन घेऊ शकता.

या ऑफरमध्ये कोणते फायदे मिळतात?

जाहिरातमुक्त संगीत, ऑफलाइन डाउनलोड, उच्च-गुणवत्तेचा ऑडिओ आणि क्युरेटेड प्लेलिस्ट.

JioSaavn Pro ची सामान्य किंमत किती आहे?

नेहमीची किंमत प्रति महिना ९९ रुपये आहे.

ही ऑफर किती दिवसांसाठी लागू आहे?

पहिल्या दोन महिन्यांसाठी ही खास ऑफर लागू असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: नागपुरमध्ये खासदाराच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू; वाहनाचा चक्काचूर

Sonalee Kulkarni: 'परमसुंदरी' अप्सरा सोनाली कुलकर्णीचा नवा लूक, पाहून मन होईल घायाळ

Maharashtra Live News Update: Parbhani: बस आणि पिकअपचा भीषण अपघात, बस झाली पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही

karishma kapoor Children: करिश्मा कपूरच्या घरातील वाद चव्हाट्यावर; ३००० कोटींच्या वादात संजय कपूरच्या बहीणीची एन्ट्री

Torna Fort History: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, भव्य वास्तुकला आणि नैसर्गिक आकर्षण, तोरणा किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

SCROLL FOR NEXT